Rishi Sunak: ब्रिटन पंतप्रधानाच्या शर्यतीत असलेले दावेदार ऋषी सुनक यांनी आपली पत्नी अक्षता मुर्तीसह जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला. त्यांनी भक्तिवेदांत मनोर मंदिराला भेट दिली.
काल कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांनी ट्विटरवर एक ट्विट शेअर केले ज्यात त्यांनी लिहिले आहे की Today I visited the Bhaktivedanta Manor temple with my wife Akshata to celebrate Janmashtami, in advance of the popular Hindu festival celebrating Lord Krishna’s birthday.
Today I visited the Bhaktivedanta Manor temple with my wife Akshata to celebrate Janmashtami, in advance of the popular Hindu festival celebrating Lord Krishna’s birthday. pic.twitter.com/WL3FQVk0oU
— Rishi Sunak (@RishiSunak) August 18, 2022
UK पंतप्रधानाच्या स्पर्धेत...
भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक हे पुढील ब्रिटिश पंतप्रधानाच्या यादीत आहेत. ऋषी सुनक यांचा जन्म 1980 साली हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये झाला. त्यांनी Oxford विद्यापीठातून तत्त्वज्ञान ,राजकारण, आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं आहे. तसेच स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक नोकरीही केली आहे.
त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं. कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी उत्तम काम केले होते. ऋषी सुनक ब्रिटनचे अर्थमंत्री झाले. आता ते ब्रिटनच्या पंतप्रधानपदी येण्याची शक्यता आहे.