Isaac Newton Formula End Of Earth : 2060 मध्ये जगाच्या विनाशाची सुरुवात होणार. ही कोणत्या भविष्यवेत्यानी वर्तवलेली भविष्यवाणी अथवा भाकित नाही तर महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांनी केलेला दावा आहे. आयझॅक न्यूटन यांनी जगाचा विनाश कसा होईल याचा फॉर्म्युला देखील लिहून ठेवला आहे. आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या अनेक नोट्समध्ये याबाबत लिहीले आहे.
आयझॅक न्यूटन हे फादर ऑफ मॉर्डन सायन्स म्हणून ओळखले जातात. न्यूटन यांनी 2060 मध्ये जगाच्या विनाशाचा फॉर्म्युला लिहीला आहे. न्यूटन यांनी गतीच्या नियमाचा सिद्धांत मांडला. न्यूटन यांनी 1704 मध्ये एक नोट लिहिली. न्यूटनची ही नोट त्यांनी लिहिलेल्या पत्रांसोबत सापडली आहे. 1727 मध्ये न्यूटनच्या मृत्यूनंतर, त्यांनी लिहिलेल्या सर्व नोट्स आणि पत्रे त्याच्या घरात सापडली. सारा ड्रायच्या 'द न्यूटन पेपर्स: द स्ट्रेंज अँड ट्रू ऑडिटीज ऑफ आयझॅक न्यूटन मॅन्युस्क्रिप्ट्स' या पुस्तकात याची नोंद आहे. या नोट्स आणि पत्रे हाताळण्यासाठी 16 वर्षे लागली.
न्यूटन यांनी 10,000 नोट्स आणि पत्रे लिहिली आहेत. 1800 च्या उत्तरार्धात जेव्हा या नोट्स आणि पत्रे केंब्रिजमध्ये आणण्यात आली तेव्हा त्यांच्यात प्रचंड गोंधळ झाला होता. यांचा ताळमेळ बसवण्यासाठी 16 वर्षे लागली. 1936 मध्ये त्यांच्या नोट्स आणि पत्रांचा लिलाव झाला. इंग्लिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी हे नोट्स आणि पत्रे विकत घेतली. यानंतर जेरुसलेमच्या एका अभ्यासकाने या सर्व नोट्स 'सिक्रेट्स ऑफ न्यूटन' नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या. हे पुस्तक आजही जेरुसलेम विद्यापीठात ठेवण्यात आले आहे.
न्यूटनने त्यांच्या एका चिठ्ठीत जगाच्या विनाशाच देखील उल्लेख केला आहे, जगाचा एक दिवस अंत होईल. न्यूटनने वेळ आणि अर्धा वेळ या आधारावर जगाच्या विनाशाचा फॉर्म्युला मांडला. 800 हे वर्ष प्रमाण मानून, आयझॅक न्यूटनने त्याच्या गणनेवर आधारित, जगाचा अंत 1260 वर्षांत होईल असे सांगितले. 1260 ला 800 जोडून, 2060 हे वर्ष आले. त्यानुसार 2060 हे जगाच्या अंताचे वर्ष तसेच विनाशाचे वर्ष ठरु शकते असे आपल्या नोदींत नमूद केले आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन विल्यम हॉकिंग यांनीही 600 वर्षात पृथ्वीचा अंत होईल असा दावा केला आहे.