AJAB-GAJAB: जीवन आणि मरण हे कोण्याचा हातात नसतं. पण आपल्या देशात डॉक्टरांना देव मानलं जातं. कारण मृत्यूच्या दारातून डॉक्टर बाहेर आणतात. आयुष्यात काही प्रसंग असे घडतात ज्यावर आपण कधी विश्वासच करु शकत नाही. एखाद्या गंभीर आजारात डॉक्टरांसोबत देवावर आपण विश्वास ठेवतो.
आयुष्यात काही घटना या अविश्वनीय असतात. अशीच एक घटना एका चिमुरडीसोबत घडली. डॉक्टरांनी उपचारादरम्यान एका 3 वर्षीय चिमुरडीला मृत घोषित केलं होते. पण 12 तासांनंतर एक चमत्कार घडला आणि पालकांच्या आयु्ष्यात आनंद पुन्हा परतला. (trending news little girl opened her eyes 12 hours after being declared dead shocking and miraculous incident)
कॅमिलिया रोक्साना असं या मुलीचं नाव असून तिच्या पोटात संसर्ग झाला होता. आपली मुलगी मेलेली नाही म्हणून ती पुन्हा पुन्हा ओरडू सगळ्यांना सांगायला लागली. मात्र कुटुंबीय आणि डॉक्टरांनी तिला धक्का बसला समजून तिच्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी, अंत्ययात्रा निघत असताना, कॅमेलियाची आई म्हणू लागली की तिचे बाळ शवपेटीमध्ये थरथरत आहे. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. अखेर मुलगी आतून रडायला लागली आणि आईला आवाज देऊ लागली. त्यानंतर शवपेटी उघडली आणि आत असलेली मुलगी जिवंत बाहेर आली. अखेर एका आईचा विश्वास जिंकला.
मुलगी पुन्हा जिवंत होणे हा चमत्कार मानला जात आहे. त्या चिमुकलीला दुसरं आयुष्य मिळालं, असं सर्वांचं म्हणं आहे. ही घटना मेक्सिकोतील सॅन लुईस पोटोसी इथे घडली आहे. पोटात संसर्ग झाल्यानंतर मुलीला Salinas de Hildalgo Community Hospital मध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान तिच्या हृदयाचे ठोके बंद झाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.