Farmers Protest: कंगना राणौतवर भडकले रोहित शर्माचे फॅन्स, FIR करण्याची मागणी

कंगनावर FIR करण्याची मागणी

Updated: Feb 5, 2021, 01:41 PM IST
Farmers Protest: कंगना राणौतवर भडकले रोहित शर्माचे फॅन्स, FIR करण्याची मागणी title=

नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिआनाच्या ट्वीटनंतर वेगळ वळणं मिळालंय. एकीकडे लोक रिआनावर आंतरराष्ट्रीय प्रोपगंडा चालवण्याचा आरोप करतायत. तर दुसरीकडे दिग्गज खेळाडू ट्विटरवर देशाला एकत्र ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

क्रिकेटर्सबद्दलच्या ट्वीटनंतर गोंधळ

कंगना राणौत(Kangana Ranaut)ने सर्व खेळाडुंसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर क्रिकेटर्सच्या फॅन्सनी कंगनावर टीकेचा भडीमार केला. कंगनाने वादग्रस्त डिलीट केले असले तरी रोहित शर्माचे फॅन्स कंगनावर तुटून पडलेयत. कंगना राणौतवर FIR दाखल करावी अशी मागणी रोहीत शर्माच्या फॅन्सनी केली. 

शेतकरी आंदोलनावर(Farmers Protest)अनेक खेळाडू आपले म्हणणे मांडत आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या खेळाडुंनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट केलंय. रोहित शर्माने देखील यावर ट्वीट केलंय. ज्यानंतर कंगना राणौतने ते ट्वीट रिट्वीट करत सर्व क्रिकेटर्सवर निशाणा साधला होता. 

सर्व क्रिकेटपटू धोबीच्या कुत्र्याप्रमाणे ना घरचे ना घाटावरचे असे का वाटतं आहेत? असे कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

स्वत:च्या भल्यासाठी असलेल्या कायद्यांना शेतकरी विरोध का करतील ? हे दहशतवादी आहेत जे गोंधळ घालतायत. बोला ना भीती वाटतेय ? असे ट्वीट कंगनाने केले.

रोहितने काय म्हटलं ?

भारत एकजूट तेव्हाच राहीलाय जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊन समस्येचे निराकारण केलंय. आपले शेतकरी राष्ट्राच्या भल्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकजण महत्वाची भूमिका बजावेल असा मला विश्वास आहे.