रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

गुजरातमध्ये भाजप विजयी, काँग्रेस भुईसपाट - आठवले

गुजरातमध्ये भाजप विजयी, काँग्रेस भुईसपाट - आठवले

केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी गुजरात निवडणुकीत भाजापच जिंकेल आणि काँग्रेस भुईसपाट होईल, असा दावा केलाय. एनसीपीचा हल्लाबोल म्हणजे फक्त विरोध आहे, असे ते म्हणालेत. 

Dec 16, 2017, 15:25 PM IST
'ब्लॅक-डे' ला विरोध म्हणून 'व्हाईट मनी डे' - आठवले

'ब्लॅक-डे' ला विरोध म्हणून 'व्हाईट मनी डे' - आठवले

काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबरला साजरा होणार्‍या 'ब्लॅक-डे' ला आमचा विरोध असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे  तो दिवस 'व्हाईट मनी डे' म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

Nov 07, 2017, 23:05 PM IST
‘२०१४ पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता द्या’ - रामदास आठवले

‘२०१४ पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता द्या’ - रामदास आठवले

२०१४ पर्यंत झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली, तर मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्नच उरणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय. जिथे झोपडपट्टी आहे तिथेच एसआरए योजना लागू

Nov 03, 2017, 11:32 AM IST

मुंबई | रामदास आठवलेंच्या कविता

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 27, 2017, 15:08 PM IST
रामदास आठवलेंनी दिले मनसेला आव्हान

रामदास आठवलेंनी दिले मनसेला आव्हान

फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्याक आंदोलन करणाऱ्या मनसेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे. 

Oct 22, 2017, 17:41 PM IST
हातभट्टीपेक्षा रम चांगली!

हातभट्टीपेक्षा रम चांगली!

 दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.

Oct 01, 2017, 16:30 PM IST
'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'

'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय. 

Sep 24, 2017, 19:30 PM IST
आरक्षणामुळे दलितांवर अत्याचार होतात - रामदास आठवले

आरक्षणामुळे दलितांवर अत्याचार होतात - रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आरक्षणासंदर्भात एक मागणी केली आहे. खुल्या वर्गातील ५० टक्क्यांपैकी २५ टक्के आरक्षण आर्थिकदृष्टया मागासांना देण्यात यावं असं आठवलेंनी म्हटलं आहे.

Sep 07, 2017, 22:23 PM IST
आठवले यांचा १२ वर्षाचा मुलगाही राजकारणात

आठवले यांचा १२ वर्षाचा मुलगाही राजकारणात

 राज्याच्या राजकारणात आता आणखी एका नव्या घराण्याचा प्रवेश होऊ घातला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांचे चिरंजीव जीत (वय वर्षे १२) यास राजकारणात उतरवण्याचे ठरवले आहे. आठवले केवळ ठरवूनच

Sep 06, 2017, 15:35 PM IST
लष्करामध्ये आरक्षणाची रामदास आठवलेंची मागणी

लष्करामध्ये आरक्षणाची रामदास आठवलेंची मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका होत आली आहे.

Aug 21, 2017, 17:09 PM IST
'शरद पवार भाजपसोबत आले तर...'

'शरद पवार भाजपसोबत आले तर...'

शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे.

Aug 13, 2017, 19:32 PM IST
राज्यसभेत आठवलेंच्या कविता, सभागृहात एकच हशा

राज्यसभेत आठवलेंच्या कविता, सभागृहात एकच हशा

मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निरोप देताना आपल्या भाषणात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर राज्यसभेत एकच हशा पिकला.

Aug 10, 2017, 16:05 PM IST
रामदास आठवलेंची पाकिस्तानविरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची केली मागणी

रामदास आठवलेंची पाकिस्तानविरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची केली मागणी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पाकिस्तान विरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Jul 02, 2017, 14:46 PM IST

क्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jul 01, 2017, 21:14 PM IST
क्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी

क्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी

खेळामध्ये आरक्षण मागणी करत भारतीय क्रिकेट संघात दलितांना २५ % आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात केली. 

Jul 01, 2017, 19:33 PM IST
शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी आठवलेंची बॅटिंग

शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी आठवलेंची बॅटिंग

राष्ट्रपतीपदासाठी जर शरद पवार यांच्या नावाचा विचार झाला तर आम्हाला आनंद होईल, असं रामदास आठवले म्हणालेत. 

Jun 16, 2017, 18:34 PM IST

'भीम' बिबट्याला अखेर पालक मिळाले!

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

May 15, 2017, 21:52 PM IST
 त्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'

त्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'

पत्नीची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगवण्यात आली.

May 01, 2017, 16:19 PM IST
'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

'आरक्षण घेऊन ब्राह्मणांनी भारतात राहावं'

ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.

Apr 30, 2017, 17:24 PM IST