19 वर्षांच्या राशा थडानीला आवडतो 40 वर्षांचा 'हा' विवाहीत अभिनेता

Rasha Thadani:19 वर्षीय राशा थडानी जी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी आहे, हिने आपल्या पहिल्या सेलिब्रिटी क्रशबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चागलीचं चर्चा रंगली आहे. राशाने तिच्या अभिनय करिअरला देखील सुरुवात केली आहे आणि ती लवकरच इतर कलाकारांसोबत मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसेल अशी अपेक्षा आहे. 

Intern | Updated: Jan 24, 2025, 11:54 AM IST
19 वर्षांच्या राशा थडानीला आवडतो 40 वर्षांचा 'हा' विवाहीत अभिनेता

Rasha Thadani's Celebrity Crush:राशा ने नुकत्याच रिलीज झालेल्या 'आझाद' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक खुलासा केला. या चित्रपटात तिच्या अभिनयाते खूपच कौतुक केले जात आहे, विशेष म्हणजे तिचं गाणं 'उई अम्मा', जे रिलीज होताच चार्टलिस्टमध्ये आले आहे. 

राशाने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या क्रशविषयी सांगितले की, सिद्धार्थ मल्होत्रा हा तिचा पहिला सेलिब्रिटी क्रश आहे. ती म्हणाली, 'मी त्याला पाहिलं आणि त्याच्या अभिनयाने मला कायमच आकर्षित केलं. सिद्धार्थ मल्होत्रा ने 'स्टुडंट ऑफ द इयर' मध्ये पदार्पण केल्यापासूनच तो माझ्या फेवरेट अभिनेता आहे.' राशा हे सांगताना खूपच उत्साही होती आणि तिच्या मनातील भावना खुल्या केल्या.

तिच्या या वक्तव्यानंतर, अमान, जो अजय देवगनचा नातेवाईक आहे, याने देखील राशाच्या निवडीला समर्थन दिलं. अमान म्हणाला, 'सिद्धार्थ मल्होत्रा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्याच्या चित्रपटांनी त्याला चाहत्यांमध्ये एक पॉप्युलर स्टार बनवले आहे.' अमानच्या मते, सिद्धार्थने 'शेरशहा' मध्ये अभिनय केल्यावर तो एक राष्ट्रीय नायक म्हणून देखील उभा राहिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सिद्धार्थ मल्होत्राचे 'शेरशहा', 'विलेन', 'हसी तो फसी' आणि 'स्टुडंट ऑफ द इयर' सारखे चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. 2023 मध्ये कियारा अडवाणीशी त्याच्या लग्नामुळे त्याच्या वैयक्तिक जीवनालाही प्रचंड मीडिया कव्हरेज मिळालं. 

राशा थडानी देखील बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. तिच्या 'आझाद' चित्रपटाच्या यशामुळे, ती एक उगवती स्टार बनली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल देखील चर्चा सुरू आहे आणि तिच्या अभिनयाची भविष्यात मोठी अपेक्षा आहे.

अशा स्थितीत, सिद्धार्थ आणि राशा यांच्या कथा प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनल्या आहेत आणि या दोघांच्या आगामी कारकिर्दीवर देखील सर्वांचे लक्ष आहे.