Happy Birthday Aaradhya Bachchan : बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आज 16 नोव्हेंबर 2022 ऐश्वर्या राय बच्चन -अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची लेक आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी नात आराध्याचा वाढदिवस...याच वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर एक पोस्ट (social media post) शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून यूजर्स संतापले आहेत. सोशल मीडियावर ऐश्वर्याची ही पोस्ट ट्रोल (Post troll) झाली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन हिने इंस्टाग्राम (Instagram) रात्री 12 वाजता आराध्याला शुभेच्छा देण्यासाठी एक फोटो शेअर केला. आराध्या 11 वर्षांची झाली असून हा फोटोमुळे वेगळाच वाद निर्माण झाला आहे. ऐश्वर्या राय बच्चनने आराध्याला Lip Kiss करतानाचा हा फोटो आहे. या फोटोसोबत लिहिलं आहे की, 'माय लव्ह, माय लाइफ...मी तुझ्यावर खूप प्रेम करते, माझी आराध्या.'
या फोटोवरुन ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल झाली आहे. काही यूजर्स या फोटो ला क्यूट म्हणतं आहेत तर काही यूजर्सने नाराजी व्यक्त केली आहे. तर काही यूजर्सने असे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याबद्दल आक्षेप घेतला आहे.