बॉलिवूडची 'ही' फ्लॉप अभिनेत्री सांभाळतेय ६०० कोटींचा बिजनेस...

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री ट्युलिप जोशी हीच आज ३८ व वाढदिवस आहे. ११ सप्टेंबर १९७९ मध्ये एका गुजराती कुटुंबात तिचा जन्म झाला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 11, 2017, 03:09 PM IST
बॉलिवूडची 'ही' फ्लॉप अभिनेत्री सांभाळतेय ६०० कोटींचा बिजनेस...  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री ट्युलिप जोशी हीच आज ३८ व वाढदिवस आहे. ११ सप्टेंबर १९७९ मध्ये एका गुजराती कुटुंबात तिचा जन्म झाला. ट्युलिपने यश चोप्राच्या 'मेरे यार की शादी है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा हा चित्रपट हिट झाला मात्र त्यांनतर ती यशस्वी चित्रपट देऊ शकली नाही. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी तिने कन्नड, मल्याळम आणि तेलगू चित्रपटात काम केले होते. 

 

Let's create an oasis of light, laughter and love. Let's make each other ambassadors of strength, character and happiness. Let's infect everyone with joy and well-being.

A post shared by Tulip Joshi (@tulipjoshi.in) on

'मेरे यार की शादी है' नंतर तिने 'मातृभूमि', 'दिल मांगे मोर', 'धोखा', 'मिशन 90 डेज', 'कभी कहीं', 'सुपरस्टार', 'डैडी कूल' आणि 'रनवे' यांसारख्या चित्रपटात काम केले. परंतु, त्यात तिला फारसे यश मिळाले नाही. 

 

Surrender to your inner divinity...

A post shared by Tulip Joshi (@tulipjoshi.in) on

मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटात काम करताना ट्युलिप आणि कॅप्टन विनोद नायर यांचे प्रेमसंबंध जुळले. विनोद हे प्रसिद्ध कादंबरी 'प्राईड ऑफ लॉयन्स' चे लेखक आहेत. दोघ जवळपास ४ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले.  

 

Happiness is......

A post shared by Tulip Joshi (@tulipjoshi.in) on

विनोद हे १९८९ ते १९९५ पर्यंत आर्मीमध्ये होते. २००७ मध्ये त्यांनी ट्रेनिंग आणि मॅनेजमेंट कॅन्सल्टिंग फर्म  (KIMMAYA) सुरु केली आणि सध्या ट्युलिप विनोद यांचा ६०० करोडचा व्यवसाय सांभाळत आहे. या कंपनीत ती डिरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळत आहे.