Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2001 साली 'गदर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, त्याच्या तब्बल 22 वर्षांनंतर 'गदर 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर 2' ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये किती आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. 'गदर 2' ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा OMG 2 चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हे दोनही चित्रपट किती कमाई करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रतिक्षा करत होते. 'गदर 2' नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये फक्त OMG 2 नाही तर 'जेलर' पासून 'पठाण' पर्यंत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सगळ्यात महत्तावाची आणि लक्षवेधी गोष्टमध्ये OMG 2 चित्रपटात अक्षयनं असं काही केलं की त्यावरून 'गदर 2' चं प्रमोशन केल्याचं म्हटले जात आहे.
अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना इंटरव्हलनंतर मोठा धक्का बसला. त्याचं कारण म्हणजे अक्षय कुमार जिथे चित्रपटात महादेवाचा दूत म्हणून त्यांचा भक्त कांति शरण मुद्नल यांना मदत करण्यासाठी पृथ्वीलोकावर आलेला असतो. एकदिवस रात्री कांति शरण मुद्नल यांची पत्नी अंगनात अंथरून घालताना दिसते. तेव्हा बाहेरून कोणी मोठ्या-मोठ्यानं गाणं गात असल्याचं ऐकायला येतं. घरा बाहेर आलेले कांति शरण मुद्नल हे कोण गाणं गात आहे हे पाहत असतात. त्यावेळी ते बाहेर येऊन पाहतात तर तिथे दुसरं कोणी नसून अक्षय कुमार हा घरा बाहेर असलेल्या एका झाडाच्या खाली बसून 'गदर' चं गाणं गाताना दिसत आहे. ते लोकप्रिय गाणं म्हणजे 'ओ घर आजा परदेसी' आहे. अक्षय कुमार जेव्हा हे गाणं गाताना थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. त्याचं कारण म्हणजे अक्षय कुमार यावेळी फक्त त्या गाण्याच्या एक-दोन ओळी नाही तर जवळपास संपूर्ण गाण गायला आहे. हे पाहून काही चाहते आनंदी झाले आहेत.
अक्षयच्या या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडा पार केला आहे. 'ओएमजी 2' नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 10.26 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 15.3 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी कमाईत आणखी वाढ झाली असून 17.55 कोटींची कमाई होती. तर चौथ्या दिवशी कमाईत थोडी घट झाली असून चित्रपटानं फक्त 11.50 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे या चित्रपटानं चार दिवसात एकूण 54.61 कोटींचा आकडा पार केला आहे.
हेही वाचा : 'थलैवा'वर भारी पडला 'ढाई किलो का हाथ' बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' ची 'जेलर'वर मात
अक्षय कुमारच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी देखील प्रेक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. तर त्या दोघांशिवाय या चित्रपटा यामी गौतम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.