मुंबई : बिग बॉस 15 फिनालेकडे वाटचाल करत असताना, शोमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. नुकतेच एका टास्कदरम्यान रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यात जबरदस्त स्पर्धा झाली होती. जसजसा हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे जात आहे तसतसं त्यामध्ये अनेक वळणं येत आहेत. अनेकदा अंतिम फेरीसाठीचं टास्क रद्द झाल्यानंतर आता मात्र या शोमधील सेलिब्रिटी स्पर्धकांनी मोठ्या ताकदीनं खेळात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळात आहे.
'बिग बॉस 15' च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई यांनी एका टास्कमध्ये दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 15 तास या दोघीही एका खांबाच्या आधारेच उभ्या होत्या. यादरम्यान, घरातील इतर मंडळींनी त्यांना खांबापासून दूर करण्याचा फार प्रयत्न केला. पण देवोलिना आणि रश्मी या मात्र त्या खांबापासून दूर हटल्या नाहीत.
देवोलिना आणि रश्मीच्या या स्पर्धेमध्ये रश्मीनं बाजी मारली. इतकंच नव्हे, तर ती अंतिम फेरीतही पोहोचली. हा टास्क इतका अंत पाहणारा होता की, त्यामध्ये देवोलिनानं नाईलाजानं पँटमध्येच लघुशंका केली. असं करण्यापूर्वी तिनं प्रतीक या स्पर्धकाला आपल्यावर पाणी ओतण्यास सांगितलं. पाणी ओतल्यानंतरच तिनं लघुशंका केली. देवोलिनाच्या या धाडसाचीही सर्वांची प्रशंसा केली. ही टास्क जिंकण्यासाठी काहीही करु शकते, असं असिम रियाज म्हणाला.
आता देवोलिनाने टास्कसाठी लाईव्ह शोमध्ये केलेल्या या कृतीवर अनेक सेलिब्रिटी आपली प्रतिक्रिया देत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीने या घटनेवर मौन तोडले असून, मनापासून खेळ खेळल्याबद्दल अभिनेत्रीला सलाम केला आहे.
देवलिनाबद्दल विंदू दारा सिंग म्हणाला, " मला तिचे समर्पण आवडले. म्हणूनच अशा स्पर्धकांना शोमध्ये वारंवार बोलावले जाते. लघुशंका केल्याबाबत बोलायचं झालं तर, हे याआधीही अनेकदा झालं आहे. पण माझ्या मते ही बिग बॉस 15 मधील सर्वोत्तम गोष्ट आहे.
दलजीत कौर म्हणाली, "ती बाकीच्या लोकांना शोमध्ये इतकी जोरदार स्पर्धा देतेय... काही हरकत आहे. पुढच्या वेळी मी देवोलीनाला भेटेन तेव्हा मी तिला मिठी मारेन. नॅशनल टीव्हीवर लघुशंका करण्यासाठी खूप हिंमत लागते. मला वाटतं आता वाईल्ड कार्ड एंट्रीलाही शो जिंकण्याची संधी मिळायला हवी.
हितेन तेजवानी म्हणाला, 'नॅशनल टेलिव्हिजनवर देवोलिनाने लघुशंका केल्याचे ऐकून कलाकार हितेन तेजवानीला धक्का बसला आहे. हितेन म्हणाला, 'तिने 15 तास स्वत:ला रोखलं, ही मोठी गोष्ट आहे.'