Salman Khan and Lulia Vantur Photos: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये त्याने वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्याच्या खऱ्या आयुष्यातही त्याचे अनेक अफेअर्स आहेत. परंतु अद्याप सलमान खानने लग्न केलेले नाहीये. त्यामुळे आता सलमान खानने लग्न करावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. सध्या सलमान खान 60 वर्षांचा आहे. त्याचबरोबर तो बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, सलमान खान हा लुलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानने लुलिया वंतूरच्या वडिलांची भेट घेतली. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लुलिया वंतूरची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
बॉलिवूड अभिनेता सलमान खानची अफवा असलेली गर्लफ्रेंड लुलिया वंतूरने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सलमान खानसोबत दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये लुलिया वंतूरचे वडिल देखील दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यामध्ये काही चाहत्यांनी म्हटले की, सलमान खान आणि लुलिया वंतूर हे गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. दोघांची केमिस्ट्री देखील खूपच चांगली आहे. त्यामुळे दोघे लग्न करून सेटल का होत नाहीत? असा प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे.
सलमान का करत नाही लग्न?
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला अनेक कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये लग्ना संदर्भात प्रश्न विचारण्यात आले आहेत. परंतु, प्रत्येक वेळी सलमान या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतो. सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. एका मुलाखतीत सलमान खानने लग्नाबाबत एक वक्तव्य केले होते. ज्यामध्ये त्याने आपण कधीही लग्न करणार नाही असं म्हटले होते. पण आता चाहते लग्न करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.