Manasi Naik Divorce News : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा (Manasi Naik Pradeep Kharera Divorce) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीनं दुजोरा दिला होता. इतकंच काय तर त्यानं पैसा आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून तिच्याशी लग्न केलं होतं. दरम्यान, आता मानसी नाईकनं सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत तिच्यासाठी काय स्पेशल आहे या विषयी सांगितलं आहे.
मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात तिला चित्रपट विभागातील ‘डान्स अँड स्टाईल ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. या निमित्तानं आनंद व्यक्त करताना मानसीनं तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मानसीनं सगळ्यात आधी पुरस्काराचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर मानसीनं तिचे काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करत मानसीनं कॅप्शन दिलं की, 'हा माझ्यासाठी Extra Special आहे. (हा पुरस्कार माझ्यासाठी अधिक खास आहे.) अर्चना नार्वेकर आणि संपूर्ण टीमनं माझ्यावर विश्वास ठेवत आणि मला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या पुरस्कारानं मला काम करण्यासाठी नवी ऊर्जा दिली आहे. अजून बरंच काही करायचंय…ही फक्त सुरुवात आहे.' मानसीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेकांनी मानसीच्या पोस्टवर कमेंट करत तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते.