मुंबई : असं म्हणतात की, लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधल्या जातात. मलायका अरोरा खान आणि अरबाज खानसाठी '' हे सत्य सिद्ध झालं. मलायका आणि अरबाज हे एक असंच कपल होतं जात, धर्म, क्षेत्र आणि जीवनशैलीतील अडथळे ओलांडून या दोघांनी लग्न केलं होतं.
एकमेकांची संस्कृती, परंपरा आणि वारसा स्वीकारून या दोघांनी हे सिद्ध केलं की, जर प्रेम खरं असेल तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. जरी हे कपल आपल्या लग्नाचं आयुष्य खाजगी ठेवत असतील, तरीही त्यांच्यामधील प्रेम माध्यमांमध्ये वारंवार दिसून यायचं. 12 डिसेंबर 1998 रोजी या दोघांचं लग्न झालं.
मलायका अरोरा खान आणि अरबाज खानचं अफेअर एका सिनेमाच्या लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही. कॉफी कमर्शियलच्या शूटिंग दरम्यान दोघांची पहिली भेट झाली. तिथूनच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही लवकरच एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोराने 'छैय्या छैय्या' या तिच्या आयटम ने साँन्गने लोकप्रियता मिळविली.
त्यावेळी खान आणि अरोरा लग्नाविषयी मुस्लिम-निकाह निवडतील की हिंदू विवाहाची परंपरा निवडतील, अशी अटकळ वर्तवली जात होती. मात्र या कपलने सगळे अडथळे पार करून सर्वांना चकित केलं. या दोघांनी एका चर्चमध्ये लग्न केलं.
मलायका अरोरा खानने आपल्या लग्नाच्या ड्रेससाठी एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्सचे ड्रेस निवडले. अरबाजने लग्नाच्या दिवशी सूट घातला होता. तर मलायका अरोरा तिच्या लग्नात व्हाइट गाऊनमध्ये दिसली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. पण आता दोघांचाही घटस्फोट झाल्याची खंत प्रत्येकालाच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.