मुंबई : 'द स्काय इज पिंक' या सिनेमाच्या निमित्ताने प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा भारतात परतली. अमेरिकेत आपल्या अभिनयाने प्रियांकाने चाहत्यांना सरप्राईज केलं आहे. प्रियांका कितीही परदेशात राहिली तरीही ती सर्वसामान्यांप्रमाणे विचार करतेय हे तिने दिलेल्या मुलाखतीत दिसून आलंय.
'द स्काय इज पिंक' या सिनेमाच्या निमित्ताने प्रियांका प्रमोशन करत होती. तेव्हा एका मुलाखतीत तिने 'ऍप' वर पैसे खर्च करणे खूप इरिटेड असल्याचं कबुल केलं आहे. प्रियांकाला काही दिवसांपूर्वी 'टेलीप्रॉम्पटर' हा ऍप खरेदी करावा लागला. याकरता तिने 20 डॉलर मोजल्याचं सांगितलं. एका ऍपकरता कुणी एवढे रुपये मोजतं का? असा सर्वसामान्य प्रश्न प्रियांका चोप्राला देखील पडला. अनेक ठिकाणी बाइक अथवा मुलाखती द्याव्या लागतात. याकरता टेलीप्रॉम्पटर ऍपची खूप मदत होते. पण हा ऍप खूपच महाग असल्याचं तिने कबुल केलं आहे.
प्रियांका चोप्राचा बहुचर्चित सिनेमा 'द स्काय इज पिंक' प्रदर्शित झाला आहे. प्रियांकासोबत या सिनेमात फरहा अख्तर आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. जवळपास 3 वर्षांनंतर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये वापसी केली आहे.
प्रियांका आता प्रमोशनकरता भारतात होती. यावेळी तिने अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. लग्नानंतर तिला नेमकं कसं वाटतंय? याचा देखील खुलासा प्रियांकाने केला आहे. लग्नानंतर आपल्याला खूप समाधानी वाटत असल्याचं तिने सांगितलं. हा माझ्यासाठी सर्वात जास्त चांगला काळ असल्याचं देखील तिने कबुल केलं आहे. माझ्यासाठी सर्वात आश्चर्याची बाब हीच आहे की, मी जेव्हा रोज सकाळी उठते तेव्हा मला खूप खास वाटतं. हे माझं घर आहे. माझे आई-वडिल लांब असूनही मला जोनस कुटूंब माझं कुटूंब वाटतं. यावरून प्रियांका लग्नानंतर खूप समाधानी असल्याचं दिसतंय.