आलिया नव्हेतर तिच्या बहिणीला किस करताना कॅमेरात कैद झाला रणबीर कपूर,फोटो व्हायरल

रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Mar 7, 2022, 06:31 PM IST
आलिया नव्हेतर तिच्या बहिणीला किस करताना कॅमेरात कैद झाला रणबीर कपूर,फोटो व्हायरल title=

मुंबई : जेव्हा-जेव्हा बॉलिवूडच्या हॉट कपलची चर्चा होते तेव्हा आलिया आणि रणबीरच नाव सगळ्यात आधी समोर येतं. दोघंही चाहत्यांना लग्नाची बातमी कधी सांगतायेत याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो आलिया भट्टच्या बहिणीसोबत दिसत आहे. शाहीन भट्ट आणि रणबीरच्या या फोटोवर युजर्स कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.

शाहीनसोबत फोटो व्हायरल
शाहिन आणि रणबीरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये रणबीर कपूर आणि त्याची मेहुणी शाहीन भट्ट एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. या फोटोमध्ये शाहीन भट्ट रणबीरच्या अगदी जवळ बसलेली आहे आणि रणबीर कपूर तिला किस करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत केवळ आलियाच नाही तर रणबीर देखील आलियाच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. हे या फोटोवरुन स्पष्ट होतं. 

लग्नाच्या प्रश्नावर आलियाचं उत्तर
आलिया आणि रणबीरला त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रश्न अनेकदा चाहते विचारत असतात. अलीकडेच आलियालाही असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर तिने अगदी अनोख्या पद्धतीने दिलं. आलिया म्हणाली की, मी आधीच रणबीरच्या मनाशी लग्न केलं आहे.  आणि खरंतर रणबीरशी माझं लग्न होऊन बराच काळ लोटला आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जेव्हा आम्ही विधीने लग्न करू तेव्हा ते खूप चांगलं करु.