ऐश्वर्या प्रेग्नंन्ट असल्याच्या अफवांवर लोकप्रिय अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, 'तिच्यावर सगळे...'

Aishwarya Rai Bachchan Richa Chadda : ऐश्वर्या राय बच्चन हिला मध्यंतरी तिच्या रॅम्पवॉकवरून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ती गरोदर असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. त्यातून यावर एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 5, 2023, 05:08 PM IST
ऐश्वर्या प्रेग्नंन्ट असल्याच्या अफवांवर लोकप्रिय अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, 'तिच्यावर सगळे...' title=
richa chaddha reacts on aishwarya rai bachchan pregnant comment by netizens

Aishwarya Rai Bachchan Richa Chadda : अनेकदा अभिनेत्रींच्या लुकवरून त्यांची खिल्ली उडवली जाते किंवा कोणताही ड्रेस घातला की अभिनेत्रींना त्या प्रेग्नंन्ट आहे का अशीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. काही दिवसांपुर्वी ऐश्वर्या राय बच्चन हिला तिच्या वजनावरून ट्रोल करण्यात आले होते. त्यातून तिच्या ड्रेसवरूनही तिची खिल्ली उडवण्यात आली होती. त्यावेळी ती प्रग्नेन्ट असल्याचीही जोरात चर्चा रंगलेली होती. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते. परंतु या सगळ्या अफवा होत्या. या प्रकारावरून एक लोकप्रिय अभिनेत्रीनं नाराजी व्यक्त केली होती. रिचा चड्ढा हिनं एका मुलाखतीतून यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. रिचा ही वेबमालिका विश्वातील आणि चित्रपटातील फारच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा नुकताच फुकरे 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

यावेळी तिनं जिस्टशी बोलताना याविषयी खुलासा केला आहे. तिला विचारण्यात आले की जेव्हा पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिला ती प्रेग्नंट आहे अशी कमेंट करत तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती. याविषयी तिचं मतं विचारलं असता ती म्हणाली की, 'ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावर अनेक जणं जळतात.' तिच्या या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. अनेकदा अभिनेत्रींवर अशा कमेंट या वारंवार होताना दिसतात. मध्यंतरी कतरिना कैफच्या प्रेग्नंन्सची बरीच चर्चा होती.

त्यानंतर अनुष्का शर्माही दुसऱ्यांदा प्रेग्नंन्ट असल्याची जोरात चर्चा होती. त्यातून काजोल ही अभिनेत्री अशा ट्रोलिंगची शिकार झाली आहे. अशातच आता चर्चा होती ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन हिची. तिच्या या रॅम्पवॉकचीही बरीच चर्चा होती. तिच्या सौंदर्याचे अनेकांनी कौतुकही केले होते. 

हेही वाचा : शाब्बास सुनबाई! शिवानीला पुरस्कार मिळताच मृणाल कुलकर्णींच्या 'त्या' कृतीचं कौतुक

यापुढे रिचा चड्ढा असं म्हणाली की, त्या या जगातील सर्वात सुंदर महिला आहेत. असं म्हणत तिनं त्यांचे प्रचंड कौतुक केले होते. त्याचसोबत एकदंरीत सोशल मीडिया ट्रोलर्सवर ती म्हणाली की, ह्यांना प्रत्येक गोष्टींचं उत्तर का बरं द्यायचं? त्यामुळे सध्या तिच्या या वक्तव्याची सध्या जोरात चर्चा रंगलेली दिसते आहे. मागील वर्षी तिनं अली फजलशी लग्न केले. अली फजलही लोकप्रिय अभिनेता आहे. सोबतच त्याची मिर्झापूर ही वेबसिरिज ही प्रचंड गाजली होती. 2012 पासून त्यांच्या अफेअरची चर्चा होती.