KGF 2 नंतर पुन्हा विलनच्या भूमिकेत दिसणार Sanjay Dutt, इतक्या कोटीची ऑफर

Sanjay Dutt Salary In Dhanush Film : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता धनुष (Dhanush Film) 'ग्रे मॅन' आणि 'नाने वरुवेन' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला होता. 

Updated: Dec 12, 2022, 04:23 PM IST
 KGF 2 नंतर पुन्हा विलनच्या भूमिकेत दिसणार Sanjay Dutt, इतक्या कोटीची ऑफर  title=

Sanjay Dutt Salary In Dhanush Film : साऊथच्या केजीएफ 2 (KGF 2) सिनेमातून खलनायकी अभिनयाची छाप सोडणाऱ्या संजय दत्तला (Sanjay Dutt) आता पुन्हा एकदा विलनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. साऊथच्या एका चित्रपटासाठी त्याला ही ऑफर मिळाली आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला कोटी रूपये मिळणार आहेत. दरम्यान त्याला या चित्रपटासाठी किती मानधन मिळणार आहे, हे जाणून घेऊयात. 

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता धनुष (Dhanush Film) 'ग्रे मॅन' आणि 'नाने वरुवेन' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला होता. यानंतर आता तो राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर कममुला यांच्या चित्रपटात दिसणार आहे. धनुष (Dhanush Film) सोबत या चित्रपटात संजय दत्त देखील दिसणार आहे. या चित्रपटासाठी संजय दत्तला खुप मोठे मानधन मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटाचे अद्याप नाव देखील समोर आले नाही, त्याआधी संजय दत्तच्या (Sanjay Dutt Salary) मानधनाची चर्चा सुरू आहे.  

मानधन किती?

संजय दत्तने (Sanjay Dutt Salary) यश स्टारर 'केजीएफ: चॅप्टर 2' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर धनुषच्या पुढील चित्रपटात संजय दत्त विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याला 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचेही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

संजय दत्तने (Sanjay Dutt Salary) या चित्रपटासाठी होकार दिला असल्याची माहिती आहे. सध्या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2023 च्या मध्यात सुरू होणार आहे. हा सिनेमा तमिळ, तेलुगु व्यतिरिक्त हिंदीमध्ये देखील प्रदर्शित केला जाणार आहे.  

चित्रपटाचे नाव काय?

मीडिया रिपोर्टनुसार थलपती विजय आणि लोकेश कनगराज यांच्या 'थलपती 67' या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt Salary) विलनची भूमिका साकारताना दिसणार आहे.या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने संजय दत्तशी संपर्क साधला होता आणि त्यानेही या चित्रपटासाठी होकार दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान जर या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt Salary) दिसला तर तो दुसऱ्यांदा साऊथच्या पडद्यावर विलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.