सुनील शेट्टीची मुलगी अथिया- क्रिकेटर के एल राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टी म्हणतो ....

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरु आहेत

Updated: Jul 14, 2021, 07:45 PM IST
सुनील शेट्टीची मुलगी अथिया- क्रिकेटर के एल राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टी म्हणतो .... title=

मुंबई : बऱ्याच काळापासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या डेटिंगच्या बातम्या बर्‍याच जुन्या झाल्या आहेत पण आतापर्यंत अथिया आणि राहुल दोघांनीही या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. आथियाने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करत सांगितलं आहे की, ती इंग्लंडमध्ये आहे. तर दुसरीकडे टेस्ट सिरीजमुळे राहुल देखील इंग्लंडमध्येच आहे.

सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीला या दोघांच्या नात्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता अथिया खरंच राहुलला कंपनी द्यायला इंग्लडला गेली आहे का? असा प्रश्न सुनिलला विचारण्यात आला होता, यावंर सुनील दत्त म्हणाला की, ''या सगळ्यावर माझ्याकडे कमेंन्ट करायला काहीच नाही आहे. 

सुनील शेट्टीने या प्रश्नावर मौन बाळगणं पसंत केलं. सोशल मीडियावर अथिया आणि के एल राहुल हे दोघंही एकमेकांसोबत पोस्ट शेअर करत असतात. आथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आथिया 'मोतीचूर चकनाचूर' या सिनेमांत नवाजुद्दीन सिद्दकीसोबत दिसली होती. लवकरच ती 'होम सोलो' या बायोपिकमध्येही दिसणार आहेत.

नुकतच सुनील शेट्टीच्या पृथ्वी अपार्टमेंट्सच्या बिल्डिंगला सील करण्यात आलं.  अभिनेता सुनील शेट्टीचं देखील याच बिल्डिंगमध्ये घर आहे. कोरोनामुळे ही बिल्डिंग सील करण्यात आली आहे. या बिल्डिंमध्ये कोरोनाचे पाच पेशंट पॉझिटीव्ह सापडले आहेत. परंतु सुनील शेट्टी आणि त्याचा परिवार सध्या मुंबईच्या बाहेर आहेत आणि सुखरुप आहे.