मुंबई : वाढत्या वयाबरोबर त्वचा सैल होणे अगदी सामान्य आहे. पण वेळीच त्वचेची काळजी घेतल्यास ही समस्या अधिक वाढणार नाही. त्वचा सैलसर झाल्याने सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळे सौंदर्यात बाधा येते. यासाठी अनेक महिला महागड्या ट्रिटमेंट्स घेतात. पण याचे काही दुष्परिणामही असतात. पण या घरगुती उपायाने स्किन टाईट होण्यास मदत होईल...
# सैल पडलेली त्वचा घट्ट करण्यासाठी घरातच एक लोशन तयार करा. त्यासाठी एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा टॉमेटोचा रस एकत्र मिक्स करा. आणि एका हवाबंद बाटलीत घालून ठेवा.
# रोज गुलाबपाणी कापसाच्या बोळ्यावर घेऊन चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर हे लोशन चेहऱ्यावर लावा. नियमित हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील. त्याचबरोबर त्वचेवरील डागही दूर होतील.
# हे लोशन त्वचेवर ५ मिनिटे ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. आठवण्यातून तीन वेळा हा उपाय करा. नक्कीच फरक दिसून येईल.