मुंबई : आपण एखादी नवीन बॅग, पाण्याची बाटली किंवा नवीन शूज विकत घेतले की त्यासोबत आपल्याला ही छोटीशी पुडी किंवा पॉकेट मिळतेच. बरं त्यात नेमकं काय असतं? आणि याचा उपयोग तरी काय? हे प्रश्न अनेकांना पडतात. ‘ही छोटीशी पुडी फाडू नका’ किंवा ‘ती लहान मुलांच्या हातात देऊ नका’ अशा सूचनाही त्यावर लिहिलेल्या असतात. या पुडीत नेमके असते तरी काय? तर या पुडीत शेकडो छोटे छोटे पारदर्शक दाणे असतात. त्यास सिलिका जेल असे म्हणतात. पण ती निरुपयोगी नसून खूपच उपयोगी वस्तू आहे.