मुंबई : चविष्ट, रुचकर पोहे तसे सर्वांच्याच आवडीचे. या अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थावर अगदी नॉन महाराष्ट्रीयन देखील आवडीने ताव मारतात. पोह्यांवर कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातल्याने त्याची चव आणखीनच वाढते. चवीला रुचकर असलेला हा पदार्थ तितकाच आरोग्यदायी देखील आहे. फिट राहण्यासाठी नाश्त्याचा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यात कार्बोहायड्रेट आणि व्हिटॉमिन सी असते. सकाळी नाश्त्याला पोहे खाण्याचा अजून एक फायदा म्हणजे पोहे पचायला देखील हलके असतात. जाणून घेऊया पोह्यांचे अजून काही फायदे...
नियमित पोहे खाल्याने आयर्नची कमी जाणवत नाही. त्यामुळे अॅनेमियापासून बचाव होतो. शरीरात हिमोग्लोबीन आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आयर्नमुळे शरीरातील पेशींना ऑक्सीजन मिळते.
पोह्यांचे सेवन मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते. पोहे खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते. बीपी नियंत्रित राहतो. एक प्लेट पोह्यात २४४ किलो कॅलरीज असतात.
अनेक घरांमध्ये पोह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या जातात. त्यामुळे भाज्याही नकळत खाल्या जातात. ज्यामुळे शरीराला व्हिटॉमिन, खनिज आणि फायबर्स योग्य प्रमाणात मिळतात.
पोह्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
पोटाची काही समस्या असल्यास पोहे खाणे योग्य ठरेल. कारण यात कमी प्रमाणात ग्लूटोना असते. त्यामुळे डॉक्टरही पोटविकार असलेल्यांना पोहे खाण्याचा सल्ला देतात.
एक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, दररोज पोहे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. पचनतंत्र सुरळीत राहते. नाश्ताला पोह्यांसोबत सोयाबीन, सुकामेवा आणि अंड्याचे सेवन केल्यास व्हिटॉमिन्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतील.