Health Report : विकासाच्या दिशेने वेगाने पावलं टाकणाऱ्या भारताबद्दल (Developing India) करण्यात आलेल्या एका दाव्याने सरकारबरोबरच सामान्य नागरिकांनाही चिंतेत टाकलं आहे. अमेरिकेतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर जेम अब्राहम (Oncologist dr Jem Abraham) यांनी भविष्यात भारतात गंभीर आजारांची त्सुनामीच (Tunami of Chronic Diseases) येईल असं भाकित वर्तवलं आहे. यामागे जागतिकीकरण, वाढती अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि जीवनशैलीतील बदल अशी काही मोठी कारणे डॉक्टर जेम अब्राहम यांनी व्यक्त केली आहेत. ज्या वेगाने हे आजार भारताच्या दिशेने पुढे सरकतायत, ते रोकण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाला (Medical Technology) चालना देणं गरजेचं आहे, असं डॉक्टर जेम अब्राहम यांनी म्हटलं आहे.
कँसर रुग्णांची संख्या होणार दुप्पट
जागतिक कर्करोग वेधशाळेने (Globocan) वर्तवलेल्या अंदाजानुसार 2040 पर्यंत जगात कॅंसरने (Cancer) हाहाकार माजेल. 2040 पर्यंत जगात कँसर रुग्णांची संख्या 2020 च्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढलेली असेल. म्हणजे वर्षाला ही सख्या 2 कोटी 80 लाख इतकी असेल. 2020 मध्ये हीच संख्या एक कोटी 80 इतकी होती. भविष्यात जगभरात 1 कोटी लोकं या आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महिलांमध्यो होणाऱ्या ब्रेस्ट कँसरची संख्या आगामी काळात सर्वाधिक असेल. आता कँसरमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या (Lung cancer) रुग्णांची संख्या अधिक आहे.
लसीकरण ठरणार प्रभावी
भविष्यात कँसर रुग्णांचा वाढता आकडा रोखायचा असेल तर त्यावर लसीकरण (Vaccination) हा एकमेव पर्याय असल्याचं डॉक्टर अब्राहम यांनी म्हटलंय. गेल्या काही वर्षात कँसरवर वेगवेगळ्या लसी बनवण्यात आल्या आहेत. पण सध्या या सर्व लसींची चाचणी होत आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यात या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. क्वीवलेंड क्लिनिक ब्रेस्ट कँसरवरही लस तयार करत आहे.
भविष्यात अनुवांशिक प्रोफाइलिंग किंवा चाचणीद्वारे ब्रेस्ट कँसर (Breast Cancer) आणि कोलन कँसर (Colon Cancer) प्रारंभिक टप्प्यावर शोधला जाऊ शकतो. आगामी काळात जीनोमिक चाचणीचा वापर वाढणार असल्याचे डॉ. अब्राहम यांनी म्हटलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर कँसर सेल्सचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याचं आणि त्यावर उपचार करण्यासाठी होणार आहे, त्यामुळे कँसरचं मुळापासून नष्ट करणं शक्य होणार आहे. लिक्विड बायोप्सी तंत्राद्वारे केवळ रक्ताच्या थेंबाद्वारे कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो. कँसरच वेळीच निदान झालं तर तर उपचारही चांगले होतात. सध्या, बहुतेक प्रकरणांमध्ये, कँसरचं निदान होईपर्यंत रुग्ण शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला असतो.
कँसरपासून बचाव आणि त्याच्यावरचे उपचार शोधणारं तंत्रज्ञान जेव्हा विकसीत होईल तेव्हा कँसर समूळ नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं डॉक्टर अब्राहम यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन थांबवायला हवं असं आवाहनही डॉक्टर अब्राहम यांनी केलं आहे.