मुंबई : जिरे हा स्वयंपाकघरात ठेवला जाणारा असाच एक मसाला आहे जो जेवणाला अप्रतिम चव तर देतोच पण त्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक गोष्टींमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. पण जिरं हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत. आज जाणून घेऊयात जिरे पाणी पिण्याचे काय फायदे होऊ शकतात. (Jeera Water Benefits)
तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास भरलेल्या जिऱ्याच्या पाण्याने करा. जिरे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त थोडे जिरे पाण्यात उकळावे लागतील, नंतर ते थंड होऊ द्या आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. वजन कमी करण्याच्या बाबतीत जिरे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात.
एवढेच नाही तर जिरे पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्याचे पाणी सूज आणि अपचन दूर करण्यास मदत करते. तसेच जिऱ्याचे पाणी पोटदुखी बरे करण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरते.
प्रेग्नेंसीमध्ये जिऱ्याचे सेवन
प्रेग्नेंसीमध्ये पोटाची समस्या, पोट दुखी, बद्धकोष्ठता, सर्दी अशा काही समस्यांपासून जिऱ्यामुळे सुटका होऊ शकते. त्याचबरोबरीने जिरे हे लोहाचे एक उत्तम स्त्रोत्र आहे. त्यामुळे प्रेग्नेंसीदरम्यान जिरे किंवा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी उत्तम ठरते.
गरोदरपणात होणारी मळमळ दूर करण्यासाठी जिऱ्याचे सेवन तुम्ही करू शकता. पण प्रेग्नेंसीच्या कितव्या महिन्यापासून अथवा कोणत्या तिमाहीपासून जिऱ्याचे सेवन केले पाहिजे हे तुमच्या डॉक्टरांशी संवाद केल्यानंतर जिऱ्याचे सेवन करावे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
जिऱ्याचे पाणी स्तन ग्रंथींसाठी उत्तम आहे आणि म्हणूनच ते गर्भवती महिलांमध्ये स्तनपानास प्रोत्साहन देते. जिरे हा लोह आणि फायबरचा खजिना आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून अनेक आजारांपासून रक्षण करण्यात मदत होते. जिऱ्याचे सेवन रोगांशी लढते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी करते.
मधुमेहासाठी जिरे उत्तम
मधुमेहाच्या रुग्णांसाठी जिरे पाणी चांगले आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी पिऊ शकता. जिरे शरीरात इन्सुलिनचे उत्पादन उत्तेजित करते. जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
जिऱ्याचे पाणी पिण्याचे इतर फायदे
- जिऱ्याचे पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये रहाते तसेच ब्लड सर्क्युलेशन चांगले होते
- ताप असल्यास जिऱ्याचे पाणी प्यावे त्याने शरीरात गारवा निर्माण होतो आणि आराम मिळतो
- जिऱ्याचे पाणी रोज सकाळी प्यायल्याने Acidity ची समस्या होत नाही
- जिऱ्याचे पाणी बॉडी डिटॉक्स करते त्यामुळे त्वचेच्या समस्या होत नाहीत
- वजन कमी करण्यासाठी सुद्धा जिऱ्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो
- जिऱ्याचे पाणी पिल्याने शरीरातील ग्लूकोजची पातळी नियंत्रणात रहाते त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो