तीळाच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम

मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !

Updated: Jan 25, 2018, 08:17 AM IST
तीळाच्या अतिसेवनाचे  आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम title=

मुंबई  : मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !

हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि ऋतूमानासोबत स्वतःला जुळवून घेण्यासाठी या दिवसात आहारात अधिक प्रमाणात तीळ खाल्ले जातात. 

'अति तेथे माती' हा नियम आहाराच्या बाबातीतही लागू पडतो. त्यामुळे येता जाता तीळाच्या लाडवांवर किंवा 'हेल्दी' आहे म्हणून सर्रास तीळाचा आहारात समावेश करू नका. कारण तीळाच्या अतिसेवनचाही आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

तीळाच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम  

कोलन कॅन्सर  

तीळाच्या अतिसेवनामुळे पोटातील आतड्यांचे नुकसान होऊ शकते. अधिक प्रमाणात तीळ खाल्ल्यास पोटात आग होते. काहीवेळेस याचा गंभीर परिणाम होऊन कॅन्सरचा धोका संभावतो. 

वजन वाढतं 

तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर तीळाचा आहारात समावेश करताना काळजी घ्या. अतिप्रमाणात तीळ आहारात असल्यास वजन वाढू शकते. तीळामध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीज,सॅच्युरेटेड फॅट्स असतात. यामुळे वजन वाढते. 

अ‍ॅलर्जी 

तीळाच्या सेवनामुळे अ‍ॅलर्जीचा धोका असतो. तीळाचा एखादा पदार्थ खाल्ल्यास तुम्हांला खाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काहींमध्ये तीळाच्या सेवनामुळे डोळ्यावर सूज आढळून येते. 
काहींना अस्थमाचा अटॅक येऊ शकतो.काहींमध्ये पचनाचा त्रास उद्भवतो. म्हणूनच तीळाच्या सेवनानंतर तुम्हांला एखादा त्रास होत असेल तर त्याकडे लक्ष द्या. 

अपेंडिक्स 

तीळाच्या अतिसेवनाचा प्रमुख परिणाम पचनक्रियेवर होऊ शकतो. यामुळे मोठ्या आतड्याचे नुकसान होऊ शकते. काहींमध्ये अपेंडिक्सचा त्रास होण्यामागे तीळ हे प्रमुख कारण ठरू शकते. काहींना तीळाच्या अतिसेवनामुळे अपेंडिक्सचे इनफेक्शन होऊ शकते. पोटात तीव्र वेदना जाणवणं, उलटीचा त्रास होऊ शकतो. 

डायरिया 

तीळ उष्ण स्वभावाचे असल्याने त्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते. काहींना डायरिया तर काहींना बद्धकोष्ठतेचा त्रास संभवू शकतो. तीळ आणि गूळ हे दोन्ही एकाच वेळेस अधिक पोटात गेल्यास उष्णता अधिक वाढतो. 

स्किन अ‍ॅलर्जी 

तीळाच्या अतिसेवनामुळे स्किन अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. यामध्ये त्वचेवर लालसरपणा वाढणं, त्वचेवर लहान लहान लालसर चट्टे उठणं, खाज येणं 

केस गळणं  

हिवाळ्याच्या दिवसात केस गळण्याचा त्रास हमखास आढळतो. काही दिवसातच तुम्ही टकले व्हाल अशा प्रकारची केसगळती वाढते. आहारात काही दोष असल्यास त्याचा परिणामही केसांच्या आरोग्यावर होऊ शकतो. तीळाच्या अतिसेवनामुळे टाळूवरील छिद्र ड्राय होतात परिणामी केसगळती होऊ शकते. 

गर्भपात

तीळाच्या सेवनामुळे गर्भपाताचाही धोका संभावतो. गरोदरपणातील पहिले तीन महिने अधिक महत्त्वाचे असतात. या दिवसामध्ये स्त्रीला गर्भाची काळजी घेणं आवश्यक असते. अशावेळी शक्यतो तीळाचे सेवन टाळावे. यामुळे गर्भाच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो.