Ayodhya Ram Mandir opening Ceremony : संपूर्ण रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो दिवस आज उजडला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धघाटन सोहळ्याला काही तास शिल्लक राहिले आहे. आज अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रामायण हा हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो. रामायण हा रामाच्या जीवनाचा उल्लेख आहे. रामायणाचे सार सर्वांनाच माहीत आहे, पण रामायणासारख्या अनेक कथा आहेत. ज्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.आपल्या सर्वांनाच माहिती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीविष्णूंनी, प्रभू रामचंद्रांच्या रुपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. रामनवनिमित्त प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातील अनेक रहस्य, कथा आवर्जुन सांगितल्या जातात. यातील एक कथा म्हणजे, सर्वांना माहितीये श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास करावा लागला होता. चला तर मग जाणून घेऊया यामागची एक पौरणिक कथा...
वाल्मिकिनीच्या लिखित रामायणानुसार, राणी कैकेयीच्या हट्टामुळे राजा दशरथने श्रीरामाला 14 वर्षे वनवासात जाण्यास सांगितले. कैकेयीने तिची दासी मंथर हिच्या सल्ल्यानुसार राजा दशरथाकडून आपला मुलगा भरतसाठी सिंहासन मागितले आणि रामाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठविण्याचे वचन दिले. हे वचन दिताना दशरथला खूप दुःख झाले होते पण वचन देऊनही ते काही करू शकले नाही. फक्त रामही याला विरोध करू शकत होते, पण त्यांनी तसे केले नाही.
कैकेयीने रामाला 10, 12 किंवा 13 ऐवजी 14 वर्षांसाठी वनवासात पाठवण्याची अनेक कारणे होती. कैकयीला राज्यातील प्रशासकीय नियम माहित होते. त्रेतायुगातील नियमांनुसार, जर एखादा राजा 14 वर्षे राज्यापासून दूर राहिला तर तो सिंहासनावर बसण्याचा अधिकार गमावतो. याच कारणामुळे कैकयीने रामाला 14 वर्षेचा वनवास मागितला होता. दरम्यान, कैकेयीचा मुलगा भरत याने कैकेयीची ही युक्ती यशस्वी होऊ दिली नाही. त्याने राम वनवासाता गेल्यानंतर रामाच्या सिंहासनावर बसण्यात नकार दिला. जेव्हा राम वनवास संपवून राम परत आले तेव्हा भरतने त्यांना सन्मानपूर्व सिंहासन परत केले.
कैकेयीने भगवान रामासाठी 14 वर्षांचा वनवास गृहित धरला आणि समजावून सांगितले की, एखादी व्यक्ती आपल्या 14 म्हणजे पाच इंद्रियांवर, बुद्धी, मन आणि अहंकारावर तारुण्यात नियंत्रण मिळवू शकला तरच तो सक्षम होईल. रावणाचा वध करण्यासाठी तो फार महत्त्वाचा ठरला असता.
रामायण आणि महाभारत या दोन्ही कथांमध्ये 14 वर्षांच्या वनवासाची कहाणी समोर येते. रामायणात भगवान रामाला 14 वर्षे वनवास भोगावा लागली. तर महाभारत काळात पांडवांना 13 वर्षांचा वनवास आणि १ वर्ष अज्ञानाचा सामना करावा लागला. यामागे ग्रहांचे संक्रमणगी महत्त्वाचे असते. त्या काळातील लोकांचे आयुर्मान आजच्यापेक्षा खूप जास्त असायचे. शनि चालिसामध्ये ‘राज मिलत बन रामही दिन’ असा उल्लेख आहे. कैकेयीची आई हरि लिन्हा..' म्हणजे शनीच्या अवस्थेमुळे कैकेयीच्या मातेचा वध झाला आणि शनीच्या काळात भगवान रामला जंगलात भटकायला लागले. त्याच वेळी रावणवरही शनिचा प्रभाव पडला आणि त्याता रामाने वध केला. शनीने एकाला कीर्ती दिली आणि दुसऱ्याला मुक्ती. अशी ही पौराणिक कथा आहे.