छत्तीसगढ: दंतेवाडा परिसरात मंगळवारी नक्षलवाद्यांनी भाजपच्या ताफ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये भाजप आमदार भीमा मंडावी आणि पोलीस दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली होती. मात्र, तरीही नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून ताफ्यातील गाडी उडवली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, वाहनांचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा ताफा भाजप आमदार भीमा मंडावी यांचा होता. भीमा मंडावी हे सभा आटोपून येत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात आमदार मंडवी यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनाचीही हानी झाली. त्यामध्ये छत्तीसगढ पोलीस दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला.
CRPF: Between Kuakonta and Syamgiri in Dantewada, the convoy of BJP MLA Bheema Mandavi came under an IED attack today. The escort vehicle of State Police came under the blast. 5 personnel of Chhattisgarh State Police are critically injured. Reinforcement of CRPF has been rushed. pic.twitter.com/BEiRU6PqBQ
— ANI (@ANI) April 9, 2019
BJP Dantewada MLA Bheema Mandavi was also in the convoy, further details awaited. #Chhattisgarh https://t.co/D84OHpZY4x
— ANI (@ANI) April 9, 2019
Chhattisgarh: BJP convoy attacked by Naxals in Dantewada. BJP MLA Bheema Mandavi was also in the convoy, further details awaited. pic.twitter.com/MhNVtar2aD
— ANI (@ANI) April 9, 2019
<iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>