मुंबई : चीन (China) आणि पाकिस्तानसाठी (Pakistan) वाईट बातमी. रशियाची अत्याधुनिक एस -400 क्षेपणास्त्र प्रणाली S-400 Missile System) लवकरच भारताच्या संरक्षण ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. एस -400 ची पहिली तुकडी यावर्षी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रशियाकडून (Russia) प्राप्त होईल. जमिनीवरुन हवेतील लांब पल्याचे शस्त्र नष्ट करण्याची ताकद या नव्या तंत्रात आहेत. यामुळे भारताची संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. हे नवीन तंत्रज्ञान जगाठी एक आश्चर्यकारक आहे. त्यामुळे आता जेव्हा ही प्रणाली भारताला मिळणार आहे, तेव्हा चीन आणि पाकिस्तानची झोप नक्कीच उडणार आहे. त्यांना धडकी बसणार आहे.
रशियाच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्यातदार रोसोबरोनएक्सपोर्टचे Rosoboronexport) मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर मिखेयेव (Alexander Mikheyev) यांनी इंटरफॅक्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की सर्वकाही योग्य मार्गाने सुरू आहे आणि ऑक्टोबर-एन्टी-एअरक्राफ्ट एस -400 क्षेपणास्त्र यंत्रणेची पहिली तुकडी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये भारताला दिली जाईल. एस -400 ही रशियाची सर्वात प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आहे, जी 400 किलोमीटरच्या अंतरावरुन शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि अगदी ड्रोन नष्ट करू शकते.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, भारतीय तज्ज्ञ रशियात पोहोचले आहेत. जानेवारी 2021 मध्ये एस -400 वर प्रशिक्षण सुरु केले. ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने रशियाबरोबर एस -400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची पाच युनिट पाच अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्यासाठी करार केला होता. 2019 मध्ये भारताने 800 कोटी डॉलर्सचा पहिला हप्ता भरला आहे.
दरम्यान, या नवीन कराराबाबत अमेरिकेने (America)बंदी घालण्याची धमकी दिली असतानाही नवी दिल्लीत हा करार केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीस अमेरिकेच्या कॉंग्रेसने दिलेल्या अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, जर त्यांनी रशियाकडून भारताने एस -400 हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी केली तर अमेरिका भारतावर निर्बंध लागू शकतो. त्यावेळी मोदी सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, भारताकडे नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण होते जे संरक्षण क्षेत्र धोरण आणि पुरवठा या बाबींनाही लागू होते.