मुंबई : 14 फेब्रुवारीला सर्वत्र कपल्स व्हॅलेनटाईन डे सेलिब्रेट करताना दिसतात. आपल्या प्रियकरासोबत वेळ घालवत ते या दिवसाचा आनंद घेतात. व्हॅलेटाईन डे हा प्रेमाचा दिवस मानला जातो, तर या दिवशी कपल्स एकमेकांना गिफ्ट देखील देतात.
पण यंदा हा दिवस 14 फेब्रुवारीला साजरा करणं शक्य होऊ शकणार नाही अशी चर्चा होते आहे आणि त्याचं कारण आता समोर आलं आहे. त्यामुळे कदाचित 3 दिवस आधीच व्हॅलेनटाईन डे साजरा करावा लागणार आहे.
आता 'नासा'ने दिलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारीला एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. जर तो पृथ्वीवर आदळला तर होणारा विनाश अतिशय भयंकर असेल, असे सांगण्यात आले आहे.
या लघुग्रहाचा आकार खूप मोठा आहे. तसेच, हा लघुग्रह अवघ्या काही आठवड्यांत पृथ्वीच्या जवळ येईल.अशी माहिती समोर येत आहे. त्याला 138971 (2001 CB21) असे नाव देण्यात आलं आहे. यासोबतच नासाने त्याची गणना संभाव्य धोक्यांमध्ये केली आहे.
त्याची रुंदी 4 हजार 265 फूट इतकी आहे. नासाकडून पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांच्या यादी बनवण्यात आली असून त्यामध्ये या ग्रहात समावेश आहे. जरी हा पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणारा लघुग्रह असला तरी प्रत्यक्षात तो पृथ्वीपासून तीन दशलक्ष मैल दूरवरूनही जाण्याची शक्यता आहे.
काय असतो हा प्रकार ?
छोटे-मोठे लघुग्रह अनेकदा अवकाशातून थेट पृथ्वीवर येऊन पडत असतात. यापैकी काही अगदी लहान असतात. तर काही लघुग्रह थेट समुद्रात जाऊन पडतात. पण कधी-कधी काही मोठे लघुग्रहही पृथ्वीवर पडतात.
त्यांच्यामुळे होणारा विध्वंस कल्पनेच्या पलिकडे असू शकतो. अशा लघुग्रहांच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास, असे म्हटले जाते की याआधी जेव्हा महाकाय लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता, तेव्हा डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले होते.
Disclaimer : इथे दिलेली माहिती नासाने दिलेल्या माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.