हर्षल जाधव, झी २४ तास : आपण सर्वच जण आपल्या कुटुंबियांवर प्रचंड प्रेम करतो, त्यांच्यासोबत सुख, दुःख शेअर करतो. मात्र लग्नानंतर मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक गोष्ट घरच्यांना सांगणं किंवा त्यांना सांगून करणं हे योग्य ठरतंच असं नाही. प्रत्येक गोष्ट घरच्यांना सांगणं आणि त्यानंतर करणं, यामुळे तुमच्या रिलेशनवर कळत नकळत परिणाम होतो. कधीकधी हीच तुमची सवय तुम्हाला, तुमच्या नात्याला गोत्यात आणू शकते. अनेकदा नवी नवरी सासरची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आपल्या माहेरी सांगते, या कारणावरून अनेकदा घरामध्ये वादंग झालेला आपण पाहिलाय.
लग्नानंतर आपल्या आईची मदत घेण्यात काहीही गैर नाही. मात्र प्रत्येक गोष्ट आपल्या आईला विचारून करण्याची सवय योग्य नव्हे. सासरच्या माणसांबरोबर तुम्ही कसं राहायला हवं, वागायला हवं हे प्रत्येकवेळा आईच्या सांगण्यावरून केल्यास तुमच्यात आणि तुमच्या सासरच्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. यामध्ये नवऱ्यानेही प्रत्येक गोष्ट त्याच्या आईला विचारून करणंही अनेकदा बायकोला पटत नाही. त्यामुळे नवदाम्पत्याने या गोष्टींवर लक्ष ठेवायला हवं.
प्रत्येक घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या केवळ त्या घरात राहायला हव्यात. तुम्ही त्या घरचा भाग झाल्यावर आपसूकच या गोष्टी तुम्हालाही समजतात. मात्र जेंव्हा तुम्ही या गोष्टी तुमच्या माहेरच्यांना सांगतात, तेंव्हा माहेरची मंडळी सासरच्यांना कुठेतरी जज करायला लागतात. यामुळे तुमच्या माहेरी सासरची इमेज खराब होऊ शकते. ज्याचा परिणाम तुमच्या रिलेशनवर होऊ शकतो. जेंव्हा मुलीच्या सासरची मंडळी मुलीच्या माहेरी जातात तेंव्हा कदाचित मुलाच्या घरच्यांना चांगली वर्तणूक मिळत नाही. यामुळे तुमच्या नात्यात कॉम्प्लिकेशन येऊ शकतात.
लग्नानंतर जेंव्हा नवरी सासरला जाते तेंव्हा ती एका नव्या वातावरणात जात असते. अशात अनेकवेळा नवीन घरातील अनेक गोष्टी नवरीला खटकू शकतात. अशात सासरची प्रत्येक लहानसहान गोष्ट माहेरच्यांना सांगणं ही चांगली सवय नाही. आपल्या मनातील विचार शेअर करणं चुकीचं नाही. मात्र, सासरची प्रत्येक गोष्ट दररोज घरच्यांना सांगणं. तुमच्या रिलेशनसाठी योग्य नाही. यातील काही गोष्टी माहेरच्यांना सांगणं हे सासरच्यांना, तुमच्या नवऱ्याला खटकू शकतात. यामुळे तुमच्यात वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.
नवीन लग्न झाल्यानंतर अनेकदा नवरा आणि बायकोत बॉण्डिंग होण्यास वेळ लागतो. असतेच जेंव्हा गोष्ट इंटेमसीची येते, तेंव्हा या गोष्टी केवळ नवरा आणि बायकोतच राहायला हव्या. जर तुमच्याकडून तुमच्या नवऱ्यासोबतच्या इंटिमेट नात्याबाबत तुमच्या आईसोबत किंवा बहिणीसोबत चर्चा करत असाल तर ते योग्य नाही. नवरा बायको एकमेकांसोबत लैगिक आयुष्यात कम्फर्टेबल आहेत की नाही हे तुम्हा दोघांमध्येच राहायला हवं. संपूर्ण कुटुंबाला यात इन्व्हॉल्व्ह करणं बरोबर नाही. अशात तुमच्या इंटिमेट रिलेशनबाबत माहेरच्यांकडून एखादी गोष्ट निघाली, तर यामुळे केवळ नवऱ्याचा पाराच नाही चढणार तर यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. यामुळे अशा गोष्टी आपापसात सोडवलेल्या बऱ्या.
for healthy relation between husband and wife avoid sharing these four things to family