मुंबई : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्ग दरम्यान कोरोना लसची (Corona Vaccine) वाट पाहणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतात कोरोना 'लस'ची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे. लवकरच 'लस'च्या वापरास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेकाची (Oxford-AstraZeneca) कोरोना लस पुढील आठवड्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारत सरकार कोविशिल्ट ( Oxford-AstraZeneca) लस कोविशिल्टच्या (Covishield) आपत्कालीन वापरास पुढील आठवड्यात मान्यता मिळू शकेल.
सीरम संस्थेने (Serum Institute) या संदर्भात सरकारला अधिक डेटा उपलब्ध करुन दिला आहे. ज्याची मागणी करण्यात आली. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट (एसआयआय) कोविशिल्ट लस बनवित आहे.
ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राजेनेका (Oxford-AstraZeneca) या कोवीशिल्ट (Covishield) लसला सरकारने मंजूर केल्यास भारत या लसच्या वापरास अनुमती देणारा पहिला देश असेल. यासह कोविशिल्ट ही भारताची पहिली लस होईल कारण अद्याप कोणत्याही लस वापरासाठी मंजूर झालेली नाही.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca सोबत ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस तयार करण्यासाठी करार केला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकाने असा दावा केला आही की, अंतिम चाचण्यांमध्ये कोरोना लस ९० टक्के प्रभावी ठरत आहे.
देशात १६३ दिवसांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांच्या खाली आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाव्हायरसचे २३ हजार ९५० नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत २६ हजार ८९५ रूग्ण बरे झाले, त्यानंतर कोरोनाकडून पुनर्प्राप्तीचा दर ९५.६९ टक्के झाला आहे. यासह कोविड -१९ मधील मृत्यूचे प्रमाण खाली आले असून ते १.४५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. भारतात आता कोरोनाची २ लाख ८९ हजार २४० सक्रिय प्रकरणे आहेत.