'OYO नाही तर कॅब आहे', टॅक्सी चालकाची ताकिद सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल

Viral Cab Driver Note : हैदराबादमधील एका कॅब ड्रायव्हरने पॅसेंजर्सने चक्क नोट लिहून ताकिद दिली आहे. ही नोट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 22, 2024, 07:45 AM IST
'OYO नाही तर कॅब आहे', टॅक्सी चालकाची ताकिद सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल  title=

हैदराबादच्या कॅब चालकाने ग्राहकांसाठी एक अजबच फर्मान काढला आहे. यामध्ये ड्रायव्हरने कॅबच्या सीटमागे एक नोटीस लावली आहे. ज्यामध्ये लिहिलं की, (Waring!! No Romance, This is a Car) चेतावणी! रोमान्स चालणार नाही, ही एक कार आहे. शांतपणे बसून अंतर राखा, असे नोटीसमध्ये लिहिले आहे. पुढे म्हटलंय हे OYO नाही तर कॅब आहे.

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो बघून लोक चांगलीच मजा घेत आहे. तर काही लोक या नोटला बघून हैराण झाले आहेत. लोकांची मतं काहीही असोत पण या कॅब चालकाची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. 

सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

कॅबमध्ये बसलेल्या एका तरुणाने या वॉर्निंगचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यानंतर हा फोटो पोस्ट व्हायरल आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होत आहे. यावर टीका होत आहे. 

बंगलुरुच्या चालकाने देखील बनवला अजब नियम 

या अगोदर बंगलुरुमध्ये एका कॅब चालकाने आपल्या कारमध्ये अजब-गजब नियम लावले होते. प्रवाशांसाठी त्याने 6 नियम बनवले होते. 

1. तुम्ही या कारचे मालक नाही.
2. गाडी चालवणारी व्यक्ती कॅबचा मालक आहे.
3. आदरपूर्वक बोला आणि आदर करा.
4. दरवाजा हळूवारपणे बंद करा.
5. तुमचा ऍटिट्यूड तुमच्या खिशात ठेवा, तो आम्हाला दाखवू नका, त्यासाठी जास्त पैसे मिळत नाहीत.
6.आम्हाला भाऊ म्हणू नका. आम्हाला लवकर गाडी चालवायला सांगू नका.