भुवनेश्वर : 'भारतीय लोकं नेहमीच त्यांच्या जुगाडासाठी ओळखले जातात'. या वाक्याला आपल्यापैकी प्रत्येक जण मान्य करेल आणि ते खरे देखील आहे. जुगाड करण्यासाठी भारतीयांचा हात कोणीच पकडू शकत नाही. भारतीय लोकं कधी पैसे वाचवण्यासाठी तर, कधी आपली युक्ती दाखवण्यासाठी वेगवेगळे जुगाड करत असतात. असे जुगाड आपण नेहमीच सोशल मीडियावर पाहातो. यापैकी काही व्हीडिओ मजेदार असतात जे आपल्याला खूप हसवतात, तर काही व्हीडिओ असे असतात जे लोकांना विचार करायला भाग पाडतात.
आपल्या भारतात इतके हुशार लोकं आहेत की, जे तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या युक्तीचा वापर करुन तुम्हाला थक्कं करु शकतात. असाच एक लोकांना थक्कं करणारा व्हीडिओ सध्या ट्वीटरवर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बाईकचे रुपांतर रुग्णवाहिकेत केले आहे.
ज्यामध्ये एका गरोदर महिलेला झोपवून रुग्णालयात घेऊन जाणार आहेत. हा खरोखरंच एक चांगला जुगाड आहे. या व्हीडिओला शेअर करताच अनेक लोकांनी शेअर आणि लाईक्स केले. तसेच बरेच लोकं या रुग्णवाहिकेची प्रशंसा करण्यापासून स्वत: ला थांबवू शकले नाहीत.
हा व्हीडिओ आयपीएस रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्वीटर अकांउंटवरुन शेअर केला आहे. जो पाहून लोकं आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्यावर लिहले की, 'भारताचा इनोव्हेशन #odisha'
Indian innovation
Perhaps #Odisha pic.twitter.com/NJZwfGOVzT
— Rupin Sharma IPS (@rupin1992) May 25, 2021
हा व्हीडिओ पाहून तुम्ही देखील स्वत: ला 'ये मेरा इंडीया' बोलण्यापासून थांबवू शकत नाही. एका तरुणाने हा झुगाड केला आहे. परंतु याला जुगाड न म्हाणता, हा खेडेगावासाठी वरदान आहे. एखाद्या रुग्णाला वाचवण्याचा हा एक चांगला पर्याय असल्याचे आपण म्हाणू शकतो.
कारण आपल्या भारतातील काही भागात रुग्णवाहिका पोहचू शकत नाही किंवा काही ठिकाणी अरुंज रस्ते आहेत किंवा कच्चे रस्ते आहेत अशा भागात या बाईक रुग्णवाहिकेचा वापर अत्यंत महत्वाची भूमिका बाजावेल.
तसेच भारताच्या काही भागात ट्रॅफीकची समस्या देखील आहे. अशात ही बाईक रुग्णवाहिका लवकर त्यातून मार्ग काढू शकेल आणि वेळेवर रुग्मालयाच पोहोचल्याने रुग्णांचे प्राण देखील वाचतील. त्यामुळे जर यावर नीट विचार आणि रिसर्च केला तर, कदाचीत भारतातील काही भागात या बाईक रुग्णवाहिकेचा वापर आपण अधिकृत रित्या करु शकतो.