PM Modi at Mahakumbh Video : महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी; पवित्र त्रिवेणी संगमावर महास्नान

 Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पवित्र त्रिवेणी संगम घाटावर महास्नान.

Updated: Feb 5, 2025, 02:34 PM IST
PM Modi at Mahakumbh Video : महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी; पवित्र त्रिवेणी संगमावर महास्नान title=

Mahakumbh 2025:  उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (5 फेब्रुवारी 2025) हजेरी लावली. अष्टमीच्या शुभ दिवशी त्यांनी इथं उपस्थिती लावत पवित्र गंगा नदीवर असणाऱ्या त्रिवेणी संगम इथं अमृत स्नान केले. 10.05 मिनिटांनी पंतप्रधान मोदी प्रयागराजला पोहचले. 

काटेकोर सुरक्षाव्यवस्थेत त्यांनी नौकेच्या माध्यमातून या भागाचा आणि कुंभमेळ्याचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी स्नान करताना भगवे कपडे आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ घातली होती. मंत्रोच्चारांच्या पठणादरम्यान पंतप्रधानांनी हे महास्नान केले. या महास्नानादरम्यान पंतप्रधान स्वत: देखील मंत्रांचा उच्चार करताना दिसले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील तिथेच उपस्थित होते. त्रिवेणीच्या पावन संगमावर स्नान केल्यानंतर पंतप्रधानांनी गंगेची पूजा-अर्चा केली, यावेळी 26 साधूसंतांसोबत त्यांनी हा विधी पार पाडला.  

गंगेच्या तीरावर असलेल्या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पूर्ण विधीपूर्वक पूजाअर्चा केली. या दरम्यान पंतप्रधानांनी हिमाचली टोपी घातली होती, त्यावर काळा कोट आणि भगवी शाल घेतली होती. ही विधी झाल्यानंतर पंतप्रधान सर्व अखाड्यांच्या महामंडलेश्वरांची भेट घेतील, असं सांगितलं जातंय. यापूर्वीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयागराज येथे झालेल्या अर्धकुंभमध्येही श्रद्धापूर्वक स्नान केले होते.