गाजियाबाद : मुलगा झाला नाही या रागातून आपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. गाजियाबादमधील पाटला शहरात ही धक्कायदाक घटना घडली. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
आरती असे या महिलेचे नाव असून तीन महिन्यांपुर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. मुलगा न झाल्याने तिची खूप चिडचिड होत होती, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश तोमर यांनी दिली आहे.
रविवारी महिलेने उशीच्या सहाय्याने मुलीचं तोंड दाबून हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवला होता. सुरुवातीला मुलीचं अपहरण झाल्याचा दावा केला होता. पण कसून चौकशी केल्यानंतर आपणच आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली तिने दिली'. असं आकाश तोमर यांनी सांगितलं.
तसंच कुटुंबियांनी मुलासाठी कधीच तिच्यावर दबाव टाकला नसल्याची माहिती पोलीसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.