Rishi Sunak Ashish Nehra : ब्रिटनमध्ये लिझ ट्रस यांचं सरकार फक्त 45 दिवसांनी कोसळलं. त्यानंतर आता ब्रिटनच्या राजकीय इतिहासात मोठा इतिहास घडला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान (Uk New Prime Minister) असणार आहेत. त्यामुळे आता जगभरातून सुनक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
ब्रिटनमध्ये सध्या सुनक यांची लाट दिसत असली तरी भारतात वेगळाच प्रकार पहायला मिळत आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान (Rishi sunak prime minister) झाल्याने भारतात आशिष नेहरा ट्रेंड होत असल्याचं पहायला मिळतंय.
आणखी वाचा - Rishi Sunak: पसारा घालणारी बायको अन् पंतप्रधान नवरा... प्रेमात सगळं काही माफ असतं!
ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि आशिष नेहरा (Ashish Nehra) यांच्या चेहऱ्यात अनेकांना साम्य आढळून आलंय. सुनक हे टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आशिष नेहरासारखे दिसतात, असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणण आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) मिम्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
PM Modi and PM #RishiSunak discussing how to get Kohinoor back to India. pic.twitter.com/mXlWR0q2r9
— Vinay (@Being_Humor) October 24, 2022
दरम्यान, ऋषी सुनक यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मोरडॉन्ट यांनी यूके पंतप्रधान होण्याच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे ऋषी सुनक यांना मार्ग मोकळा झाला. त्यानंतर ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय वंशाचा नेता पंतप्रधानपदी विराजमान होत आहे. त्यामुळे भारतात देखील आनंदोत्सव साजरा होताना दिसतोय.