Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारचा विरोध असताना लेस्बियन कपलचा रोमान्सचा VIDEO VIRAL

Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. अशातच एका लेस्बियन कपलचा रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

Updated: Mar 14, 2023, 04:46 PM IST
 Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारचा विरोध असताना लेस्बियन कपलचा रोमान्सचा VIDEO VIRAL title=
Same Sex Marriage yashvika payal lesbian couple kissing Romance video viral on social media

Same Sex Marriage Viral Video : प्रेम म्हणजे प्रेम असतं,तुझं नी माझ सेम असतं...मग समलैंगिक नात्याला अजूनही विरोध का? असा प्रश्न त्या प्रत्येक समलैंगिक कपलला पडला आहे. समलैंगिक लग्नाचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. कारण केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र देऊन समलैंगिक लग्नाला विरोध केला (indian government opposed same sex marriage) आहे. यानंतर समलैंगिक कपल अस्वस्थ झाले आहेत. सोशल मीडियावर लोकप्रियक यशविका आणि पायल (payal and yashvika dutt) यांचा रोमान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) झाला आहे. 

रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल (Romance viral video)

या व्हिडीओमध्ये पायल आणि यशविका एकमेकांना किस करताना दिसतं आहे. या दोघांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं आहे. आता ते त्या क्षणाची वाट पाहत आहेत जेव्हा त्यांचा लग्नाला कायद्याने मान्यता मिळेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण केंद्र सरकारने विरोध दर्शविल्यामुळे ते दोघे नाराज झाले आहेत. त्यांचासारखे अनेक जण या बातमीनंतर अस्वस्थ आहेत. त्या दोघांना आशा आहे की काही दिवसांनी तरी हे चित्र बदलेले. यशविका म्हणाली आहे की, LGBTQ समुदायापेक्षा सरळ समाजातील या दोघांना जास्त साथ देतं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ज्यावेळी या दोघांनी लग्न केलं तेव्हा त्यांना त्यांचाच म्हणजे LGBTQ समुदायाकडून विरोध झाला. त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. ते म्हणाले की लग्नाचा वेळी तुमच्यापैकी एकाने शेरवानी का घालती? दोघींनी लेहेंगा का घातला नाही. 

'स्वातंत्र्याच्या नावाखाली होणाऱ्या या लढ्यात रस्त्यावर नग्नता दाखविण्यात आली, हे मला मान्य नाही. असंही पायल यावेळा म्हणाली. काही दिवसांपूर्वी Whats The Life Of A Lesbian Couple? या प्रश्नावर पायल आणि यशविकाने लोकांच्या प्रश्नाला यूट्यूबवर लाइव्ह करुन उतरलं दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका आणि त्यांचं नातं याबद्दल छान सांगितलं. 

असो सुप्रीम कोर्टात समलैंगिक लग्नाला मान्यता मिळावी या मागणीसाठी सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात यावर काय निर्णय येईल याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.