SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ!

SBI Card: तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका बसणार आहे. जाणून घेऊया नेमकं काय बदल झाले आहेत. 

Updated: Feb 20, 2023, 01:04 PM IST
SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ! title=
SBI Card to hike processing fee on rent payments

SBI Card: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या (SBI) ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. तुमचेही SBI मध्ये खाते असेल तर ही महत्त्वपूर्ण बातमी नक्की वाचा. कारण या बॅकेतील ग्राहकांना आता कार्डसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. दरम्यान 17 मार्च 2023 पासून एसबीआय बँकेतील नियमात काही बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर दिसून येईल. 

या शुल्कात वाढ

SBI कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेसकडून सांगण्यात आले की, बँकेने कार्ड शुल्कात वाढ केली असून 17 मार्च 2023 पासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे. SBI ने क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट (Rent Payments) करण्यावर प्रोसेसिंग फी वाढवली आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना एक मेसेज पाठवला. त्यात क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी 199 रुपये + कर भरावा लागणार असल्याचं स्पष्ट केलेय.

वाचा: दोन पराभवानंतरही कर्णधार कमिन्स मायदेशी परतला, नेमकं कारण काय? 
 
आतापर्यंत, ग्राहक क्रेडिट कार्डद्वारे रेंट (credit card) भरण्यासाठी 99 रुपये + कर भरत आहेत, परंतु आता ग्राहकांना 199 रुपये + कर भरावा लागणार आहे. SBI बँकेने केलेला हा नवा बदल 15 मार्च 2023 पासून लागू होईल. SBI ने नोव्हेंबर 2022 मध्ये यासाठी 99 रुपये + कर असे शुल्क लागू केले होते. 

यापूर्वीही अनेक बँकांनी केली वाढ 

SBI कार्डने सांगितले आहे की, रेंट पेमेंटमध्ये प्रोसेसिंग फी वाढवत आहे. SBI क्रेडिट कार्ड भाडे देय व्यवहारावरील शुल्क सुधारित केले जात आहेत. याआधी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक बँक यांनीही वाढ केली आहे. 15 फेब्रुवारी 2023 पासून, कोटक बँकेने व्यवहाराच्या रकमेपैकी 1 टक्के आणि GST शुल्क वसूल केले आहे. त्याचबरोबर बँक ऑफ बडोदाने 1 टक्के व्यवहार शुल्क देखील आकारले आहे. HDFC बँकेने रिवॉर्ड पॉइंट्समध्येही बदल केला आहे. ICICI बँकेने देखील 20 ऑक्टोबर 2022 पासून दर बदलले आहेत.