नवी दिल्ली : जर तुम्ही एखादा व्यवसाय करण्याची योजना आखत असाल, तर पोस्ट ऑफिस (post Office) सुरु करण्याची संधी आहे. पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी घेऊन चांगली कमाई करता येऊ शकते. पोस्ट ऑफिस विभागाकडून, पोस्ट ऑफिस फ्रेंचायझीसाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी केवळ ५ हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. ५ हजार रुपये खर्च करुन पोस्ट ऑफिसद्वारे चांगल्या कमाईची संधी उपलब्ध आहे.
देशात जवळपास १.५५ लाख पोस्ट ऑफिस आहेत. परंतु तरीही पोस्ट ऑफिस सर्वत्र पोहोचू शकलेलं नाही. आपली पोहच सर्व ठिकाणी पोहचवण्यासाठी पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी देत आहे.
पोस्ट ऑफिस दोन प्रकारच्या फ्रेंचायझी देत आहे. पहिली आऊटलेट फ्रेंचायझी आणि दुसरी पोस्टल एजेंट्स फ्रेंचायझी आहे. या दोन्हीपैकी कोणतीही फ्रेंचायझी घेता येऊ शकते. देशभरात अनेक अशा जागा आहेत, जेथे पोस्ट ऑफिसची गरज आहे. परंतु पोस्ट ऑफिस सुरु करता येत नाही. अशा ठिकाणी लोकांपर्यंत सुविधा पोहचवण्यासाठी फ्रेंचायझी आऊटलेट सुरु करता येऊ शकतं. याशिवाय असे काही एजेंट्स जे शहरी आणि ग्रामीण भागात पोस्टल स्टँम्प आणि स्टेशनरी घरोघरी पोहचवतात, त्यांना पोस्टल एजेंट्स फ्रेंचायझी नावाने ओळखलं जातं.
- फ्रेंचायझी घेणाऱ्या व्यक्तीचं वय १८ वर्षांहून अधिक असणं आवश्यक आहे.
- कोणताही भारतीय व्यक्ती पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी घेऊ शकतो.
- याशिवाय कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून आठवी पासचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी घेण्यासाठी ५ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागणार आहे. फ्रेंचायझी घेतल्यानंतर तुमच्या कामाच्या हिशेबाने एक निश्चित कमिशन देलं जातं. हे कमिशन हजारों रुपये महिना इतकं असू शकतं.
या व्यतिरिक्त पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या स्टँम्प, स्पिड पोस्ट, आर्टिकल्स, स्टेशनरी, मनी ऑर्डर बुकींग यांसारख्या सुविधाही द्याव्या लागतात. पोस्टल एजेन्ट बनून ग्राहकांना या सुविधा घरोघरी पोहचवल्या जाऊ शकतात.
पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी घेण्यासाठी अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या अधिकृत लिकंवर क्लिक करा. या लिंकवर फॉर्म डाऊनलोड करुन फ्रेंचायझीसाठी अर्ज करु शकता. ज्या अर्जदारांची यासाठी निवड होईल, त्यांना पोस्ट डिपार्टमेन्टसोबत एक करार करावा लागेल. त्यानंतरच ग्राहकांना सुविधा देता येऊ शकते.