मुंबई : नरम आणि मऊ चपात्या कोणाला खायला आवडत नाहीत? परंतु बर्याच घरांमध्ये ही समस्या असते की, काही केलं तरं चपाती मऊ होत नाही किंवा जर ती मऊ झाली, तरी ती कालांतराने कडक होते. यासाठी बऱ्याचदा लोकं या ना त्या मार्गाने प्रयत्न करतात. परंतु त्याचा फारसा काही परिणाम होत नाही. लोकं चांगल्या चपातीसाठी चांगले गहू आणतात. दुसऱ्या चक्की वाल्याकडे गहू दळायला देताता. परंतु तरीही त्याचा काही फायदा होत नाही.
परंतु आज आम्ही तुम्हाला अशा टीप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, त्याचा जर का तुम्ही अवलंब केलात, तर तुमच्या चपात्या मऊ होतील आणि फुगतील देखील.
यासाठी लक्षात घ्या की, तुमच्या पिठाचा दर्जाही चांगला असणे आवश्यक आहे. यानंतर, तुम्ही रोटी कशी बनवता याची प्रक्रिया सुधारणे आवश्यक आहे. या टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी मऊ रोट्या बनवू शकता.
जेव्हा तुम्ही पीठ मळून घ्याल तेव्हा लक्षात ठेवा की, ते मऊ ठेवणे चांगले आहे. कडक पीठ मळून घेतल्यावर चपात्या जास्त काळ मऊ राहत नाहीत. वाटल्यास पीठ मळताना त्यात थोडे दूधही वापरू शकता.
पीठ मळल्यानंतर नेहमी त्याला रेस्ट करायला ठेवा. पीठ मळून घेतल्यानंतर त्यावर हलक्या हाताने पाण्याचा थर तयार करून 15 मिनिटे असेच राहू द्या. असे केल्याने तुमच्या चपात्या मऊ होतील आणि फुगतील देखील. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पीठात थोडे तेलही घालून त्याला मळु शकता आणि त्याला ठेऊ शकता.
चपाती लाटताना हात नेहमी हल्का ठेवा. चपाती लाटताना प्रथम पिठाच्या कडा लाटून घ्या आणि नंतर उरलेल्या पीठाला लाटून आकार द्या.
अनेकदा लोक चपाती लाटताना सुखं पीठ जास्त प्रमाणात वापरतात. असे केल्याने चपाती सहज लाटली जाते, पण त्यामुळे चपातीमधील ओलावा संपून ती कडक होते. त्यामुळे हे करणे टाळा.
तवा गरम केल्यानंतर, रोटी भाजताना गॅस मंद ठेवणे चांगले. तवा खूप गरम असेल तर चपात्या आधीच जास्त शिजल्या जातात आणि चुलीवर भाजून घेतल्यास त्या कडक होतात. शेवटी चपात्यांनी तूप लावून मऊ चपात्यांची मजा घ्या