ऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर..

Viral News : एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला असता त्याने त्याला काम कमी कर नाहीतर...अशी धोक्याची घंटा दिली. शिवाय त्या डॉक्टराने प्रिस्क्रिप्शन लिहिलं ते वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सोशल मीडियावर हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल (Social media viral) होतं आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 13, 2023, 01:59 PM IST
ऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर.. title=
Trending News Workaholic employee Suffering Mental Health office corporate stress solutions doctor advised prescription viral on Social media

Trending News : आपल्या पैकी अजून जण असे आहेत जे ऑफिसमध्ये ठराविक वेळेपेक्षा जास्त (Workaholic) थांबून काम करतात. भूक ताण विसरुन ते अहोरात्र काम करत असतात. या सगळ्यांचा त्यांचा आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. खास करुन अशा कर्मचाऱ्यांना मानसिक (Mental Health) आरोग्याची समस्येला सामोरे जावे लागू शकतं. अवेळी जेवण आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्य समस्यांनी गाठलं आहे. (Social media viral News)

ऑफिसमध्ये सर्वाधिक काम करणारा कर्मचारी हा ऑफिससाठी योग असला तरी तो हे असं करुन स्वत:च्या आरोग्याशी खेळ करत आहे. खास करुन मानसिक आरोग्याला निमंत्रण (Mental Health In Office Work) देत आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. अशा कर्मचाऱ्याला डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर गोळ्या ऐवजी दिलेला सल्ला सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (Social media Trending News)

न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांचं हे प्रिस्क्रिप्शन प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.  यात त्यांनी एक पेंशटला म्हटलं आहे की, सात ते आठ तास नियमित झोप, 30 ते 40 मिनिटे वेगवान चालणे, अल्कोहोलपासून पूर्णपणे दूर राहणे, तणाव कमी करणे, निरोगी आहाराचा अवलंब करणे आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कामाचे तास कमी करणे.  (Trending News Workaholic employee Suffering Mental Health office corporate stress solutions doctor advised prescription viral on Social media)

न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांनी त्यांचा अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर हे प्रिस्क्रिप्शन शेअर केलं आहे. प्रिस्क्रिप्शनचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ''एका 35 वर्षांच्या व्यक्तीने आज माझा सल्ला घेतला. त्याने स्ट्रोक टाळण्यासाठी एस्पिरिनची गोळी लिहून द्यावी अशी त्यांची इच्छा व्यक्त केली होती. त्याचे 60 वर्षांचं वडील नुकतेच स्ट्रोक (पक्षाघात ग्रस्त) होते आणि त्यांना भविष्यात स्ट्रोक होण्याचा धोका जास्त होता. मी त्याला एका गोळीऐवजी 6 गोळ्या लिहून दिल्या.'' 

या ट्वीटवर एका यूजरने विचारले की, नमस्कार डॉक्टर, ''मी 37 वर्षांचा असून मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतो. गेल्या 6 महिन्यांमध्ये माझे कामाचे तास 16-17 पेक्षा जास्त आहे. ग्लोबल रीजन्ससाठी मला नॉन स्टॉप कव्हरेज करावे लागते. नुकतेच मी माझा बीपी तपासला तर तो 150/90 आणि पल्स 84 प्रति मिनट होतं.  त्यामुळे मी पुढे काय केलं पाहिजे मला सांगा.''

या यूजर्सला ड़ॉक्टरांनी भन्नाट उत्तर दिले. ते म्हणाले की, ''एक काम करत तुझे कामाचे तास 50% कमी कर. तुझे कामाचे तास कमी केल्यामुळे एका बेरोजगार व्यक्तीला काम मिळले, ज्याचे अधिकचे काम तू करतोय. त्याशिवाय माझ्या टाइमलाइनवर पिन केलेल्या पोस्टमधील सल्ला तुही पाळ.'' 

डॉक्टरांचं हे ट्वीट आणि सल्ला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ऑफिस टाइमिंगमुळे अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पोस्टवर एका यूजर्सने असंही लिहिलं आहे की, ''त्याला वीकेंडला काम करायला सांगितल्यावर त्याने नोकरी सोडली आहे. '' या पोस्टला प्रत्येक जण रिलेट करत आहे. शिवाय सोशल मीडियावर लोक हे प्रिस्क्रिप्शन फॉलो करण्याबाबत एकमेकांना सांगत आहे.