Remdesivir injection : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने रेमडेसिवीरच्या वापराबाबत मोठा गैरसमज दूर केला आहे. रेमडेसिवीर हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महत्वाचे इंजेक्शन आहे. परंतु ते लाईफ सेविंग नाही. रेमडेसिवीरचा वापर फक्त रुग्णालयाच्या निर्देशानूसारच करणे गरजेचे आहे.
आरोग्य मंत्रालयाने ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रेमडेसिवीर हे उपचारासाठी प्रायोगिक इंजेक्शन आहे. त्याचा वापर केवळ आपत्कालीन स्थिती व्हावा.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा गरज नसताना वापर करू नये. आतापर्यंत हे पूर्णतः सिद्ध झालेले नाही. की रेमडेसिवीर कोरोना रुग्णांच्या बचावासाठी उपयुक्त आहे. थोडक्यात रेमडेसिवीर सरसकट सर्व कोरोना रुग्णांसाठी गरजेचं नाही.
Remdesivir is not a life saving drug in #COVID19. It is to be administered only in the hospital settings.#Unite2FightCorona pic.twitter.com/sdFzXfzwLO
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) April 19, 2021
कोरोना संसर्गामुळे जास्त आजारी आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिवीरचा वापर करता येईल. घरी आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर कोणत्याही परिस्थितीत रेमडेसिवीरचा वापर करण्यात येऊ नये. या इंजेक्शनचा वापर फक्त रुग्णालयीन यंत्रणेतच करावा.
आज राज्यात ५८,९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज ३५१ करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे. म्हणजे लॉकडाऊनमुळे कोरोनाचा आकडा कमी होत आहे का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर २७,०८१ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.