भरतपुर : भारत हा कृषीप्रधान देश असल्याने पावसाला देवत्व प्राप्त झाले आहे. पावसाला खुश करण्यासाठी शेतकरी राजा आतुरलेला असतो.
#Chhattisgarh: In an unusual move, women in Koriya's Bharatpur dress up as men, and men as women praying for good rains. pic.twitter.com/661wMxOMTw
— ANI (@ANI) September 16, 2017
यज्ञ, नवस, पूजापाठ, बेडकाचं लग्न असे नानाविध प्रकार देशभरात पाहायला मिळतात. पण एका आगळ्या प्रकाराने पावसाला मोहित करण्याचा प्रयत्न छत्तीसगडमध्ये सुरू असलेला पाहायला मिळत आहे.
छत्तीसगडमधील कोरियामधील महिलांनी पुरुषांसारखा आणि पुरुषांनी महिलांसारखा वेश परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्वाने वरुणराजा प्रसन्न होणार असल्याची त्यांची श्रद्धा आहे. स्थानिक लोकांनी पावसासाठी प्रार्थना करत असल्याचे दिसून येत आहे.