मुंबई : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (यूआयडीएआय) आधार कार्डधारकांसाठी आधारची अपडेट हिस्ट्री ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. यूआयडीएआये सीईओ अजय भूषण पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑनलाईन सुविधेचं सध्या बीटा व्हर्जन लॉन्च करण्यात आलंय.
ही सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाल्यानंतर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डधारक यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन आधार अपडेट हिस्ट्रीवर क्लिक करू शकतात.
- यानंतर एक सेक्शन ओपन होईल
- इथं तुम्हाला आपला आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी आणि सिक्युरिटी कॅप्चा भरावा लागेल
- यानंतर कार्डधारकांकडे एक ओटीपी येईल... हा ओटीपी वेबसाईटवर देण्यात आलेल्या एका बॉक्समध्ये भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाची हिस्ट्री पाहता येईल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधार अपडेट हिस्ट्रीमध्ये आधार कार्डात झालेल्या क्रमांकाच्या बनवण्यापासून ते शेवटच्या अपडेटपर्यंत तिथीवारनुसार माहिती उपलब्ध होईल.