नागपुरात चालत्या बाईकवरील तरूणीवर चाकूने वार

पारशिवणी तालुक्यातील शिंगोरी येथील बस स्टॉपजवळ तिची हत्या करण्यात आली.  मंगल उर्फ साजन बागडे, असे आरोपीचे नाव असून, तो २५ वर्षांचा आहे.

Jaywant Patil Updated: Mar 17, 2018, 06:29 PM IST
नागपुरात चालत्या बाईकवरील तरूणीवर चाकूने वार title=

नागपूर : नागपुरात २२ वर्षीय तरुणीवर चाकूने वार करुन, तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. रत्नमाला राजकुमार रांगणकर असे मृत तरुणीचे नाव आहे. पारशिवणी तालुक्यातील शिंगोरी येथील बस स्टॉपजवळ तिची हत्या करण्यात आली.  मंगल उर्फ साजन बागडे, असे आरोपीचे नाव असून, तो २५ वर्षांचा आहे.

बाईकवरून कट मारून तरूणीला खाली पाडले

रत्नमाला तिच्या आईसोबत स्कूटरवरुन जात होती, त्याच वेळी बाईकवरुन आलेल्या आरोपीने कट मारुन तिला खाली पाडले. त्यानंतर आरोपीने रत्नमालावर चाकूचे वार केले. यात रत्नमाला गंभीररित्या जखमी झाली. ही घटना आज सकाळी 9.30 च्या सुमारास घडली.

तिच्या हत्येचं कारण अस्पष्ट असले, तरी आरोपी मंगल बागडे हा रत्नामालाच्या ओळखीतला होता.

आरोपीला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र आरोपीला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर कामठी येतील आशा हॉस्पिटलमध्ये, रत्नमालाला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. तिथेच रत्नमालाचा मृत्यू झाला. रत्नमाला रांगणकर वेस्टर्न कोल फिल्ड या सरकारी कोळसा कंपनीत कार्यरत होती.