मुंबई : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य बँकांच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा महाशिवरात्रीची सुट्टी असूनही मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरु राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात घेण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये उद्या बँका सुरु ठेऊन पात्र खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली होती. त्यास बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बँक आणि जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. ज्या खातेदारांच्या बँक खात्यात कर्जमाफीची, वन टाईम सेटलमेंटची तसेच प्रोत्साहन लाभाची रक्कम जमा झाली आहे त्या शेतकऱ्याला याची माहिती मिळेल, हेही बँकांनी सुनिश्चित करावे,असे निदेशही सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू यांनी यावेळी दिले.