Jitendra Awhad : ठाणे महापालिकेचे (Thane Municipal Corporation) अधिकारी महेश आहेर (Mahesh Aher) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आव्हाड यांच्या चार कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. ( Thane News in Marathi )राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश आहेर याला आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर गाठून चोप दिला. ( Maharashtra News in Marathi )
महेश आहेर हा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त असून आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी त्यानं तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी आहेरला ताब्यात घेतले. मात्र आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच पेटले आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केला. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री आहेत. तर धमकीचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा आव्हाड वर्तक नगर पोलिसांत तक्रार दिली.
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी केलीय. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या धमकीप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. घटनेची शहानिशा करुन पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते उल्हासनगरमध्ये बोलत होते.