मुंबई : ED action against Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. एकनाथ खडसे यांना मोठा दणका बसला आहे. खडसे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीची मनी लाँडरिंग प्रकरणात कारवाई करताना लोणावळा, जळगाव येथील जवळपास 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (ED action against Eknath Khadse, property worth crores seized in Jalgaon, Lonavla)
पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत ही वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीकडून लोणावळा, जळगावमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून खडसे यांची 5 कोटी 73 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Maharashtra | Enforcement Directorate seizes properties of NCP leader Eknath Khadse located in Lonavala and Jalgaon in connection with the Bhosari MIDC land deal case. The value of seized properties is over Rs 5 crores.
— ANI (@ANI) August 27, 2021
मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात आहे. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ईडीच्या आरोपानुसार 2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला होता.