रत्नागिरीतील एमआयडीत कंपनी गोडावूनला मोठी आग, एका कामगाराला वायुची बाधा

Fire in Lotte MIDC​ : मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी ऑर्गेनिक कंपनीत आज पहाटे मोठी आग लागली.  

Updated: Apr 17, 2022, 08:40 AM IST
रत्नागिरीतील एमआयडीत कंपनी गोडावूनला मोठी आग, एका कामगाराला वायुची बाधा title=

रत्नागिरी :  Fire at company godown in Lotte MIDC : मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी ऑर्गेनिक कंपनीत आज पहाटे मोठी आग लागली. या आगीत कंपनीचे गोडावून जळून खाक झाले. कंपनीला लागणारा कच्चा माल या गोडावूनमध्ये ठेवण्यात आला होता. या कंपनीचा मुख्य प्लांट आणि अशोका गॅसचा प्लांट जवळच असल्याने आगीचा धोका वाढला आहे.

रत्नागिरीतील एमआयडीत कंपनी गोडावूनला मोठी आग, एका कामगाराला वायुची बाधा

कंपनीच्या कामासाठी लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. सॉल्वंट अत्यंत ज्वनशील असल्याने, ही आग झपाट्याने वाढली. एमआयडीसीच्या दोन अग्निशमन बंबांसह चिपळूण आणि खेड नगरपालिकेचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र आगीने रौद्ररुप धारण केले असल्याने ती अजून आटोक्यात आलेली नाही.

आग लागली तेव्हा गोडावूनमध्ये कोणीही नव्हते. दरम्यान, एका कामगाराला वायूची बाधा झाली आहे. या कंपनीचा मुख्य प्रकल्प आणि अशोका गॅस कंपनी, या गोडावूनच्या बाजुला आहे. आग आटोक्यात आली नाही मोठी दुर्घना घडण्याची शक्यता आहे.  आग आटोक्यात आणण्यायाठी कंपनीचे कामगार, ग्रामस्थ, अग्निशमन यंत्रणांचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.