Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम

Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...

नेहा चौधरी | Updated: Oct 23, 2024, 12:06 PM IST
Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम title=
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MahaYuti insurgency 18 seats in mahayuti are still undecided

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून 99 तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 45 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही उमेदवाऱ्यांना एबी फॉर्म देण्यात आलंय. अशातच महायुतीला पक्षात बंड होण्याची भीती सतावत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

महायुतीत अजून 18 जागांचा घोळ सुरु असून मुंबईतील काही जागांवर अजूनही तिन्ही पक्षात तिढा कायम आहे. काही जागांवर उमेदवार जाहीर केल्यास बंड होण्याची भीती महायुतीतील तिन्ही पक्षांना आहे. त्यामुळे बंड होऊ नये यासाठी तिन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय. तर काही जागांवर मविआचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कोणत्या जागांवर पेच कायम आहे?

मुंबईतील जागा 
 
अंधेरी पूर्व - भाजप आणि शिवसेना दोघांचाही दावा 
चेंबूर - शिंदेंचा दावा मात्र भाजप देखील मागत आहे 
दिंडोशी - भाजप आणि शिवसेनेकडून दावा
कलिना - शिवसेना, भाजप दावा 
वरळी - शिवसेना, भाजपचा दावा 
वर्सोवा - भाजप आणि सेना दोघांचाही दावा 
शिवडी - सेना आणि भाजप 
धारावी - शिवसेनेचा दावा मात्र भाजपची देखील मागणी - गेल्या वेळेस भाजपनं लढली होती 

ठाणे 

मिरा भाईंदर - गीता जैन - भाजपच्या नरेंद्र मेहता देखील इच्छुक 

कोल्हापूर 

कोल्हापूर उत्तर - कृष्णराज महाडिकसाठी भाजपचा दावा तर शिवसेनेकडून राजेश श्रीरसागर इच्छुक 

सिंधुदुर्ग 

कुडाळ विधानसभा - आता शिवसेनेकडेच राहणार 

रत्नागिरी 

गुहागर - शिवसेना आणि भाजपकडूनही जोरदार तयारी 

सोलापूर

करमाळा - अपक्ष संजय शिंदे - मात्र भाजपकडून उमेदवार देण्याची तयारी 

बार्शी - अपक्ष उमेदवार - भाजप दावा 

अहमदनगर 

कोपरगाव - अजित पवार गट - स्नेहलता कोल्हे पाटील दावा (भाजप) 

परभणी 

गंगाखेड (रासपकडे असलेल्या जागेवर भाजप लढण्याची शक्यता) 

नांदेड 

लोहा (प्रतापराव चिखलीकरांसाठी भाजपचा दावा) 

अमरावती 

बडनेरा (अपक्ष) - भाजपच्या उमेदवाराकडून देखील मागणी 

अकोला 

बाळापूर - भाजपच्या माजी आमदारांकडून मागणी - भाजपचा दावा