नागपूर : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. चार ते पाच डॉक्टरांनी त्याला मारहाण केल्या आरोप कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या मारहाणीच्या निषधार्थ मेडिकल अधिष्ठाता कार्यालय परिसरात सुपर स्पेशालिटी, मेडिकल, ट्रामा केयर सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू केले आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर कारवाईची मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे.
#BreakingNews । नागपुरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा निषधार्थ मेडिकल अधिष्ठाता कार्यालय परिसरात सुपर स्पेशालिटी, मेडिकल, ट्रामा केयर सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन https://t.co/Ct4fYevvP7 pic.twitter.com/WHwl2rY2AP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 4, 2020
मंगळवारी दुपारी सुपर स्पेशालिटी लिपिक शरद साबळे यांना प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कर्मचार-यांनी संताप व्यक्त करत त्या प्रशिक्षणार्थी डॉकटरवर कारवाईची मागणी केली आहे. आणि आज मेडिकल अधिष्ठाता कार्यालय परिसरात घोषणाबाजी करत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.